Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : CM पदाच्या चर्चेत ट्विस्ट; फडणवीसांच्या निकटवर्तीयाचे नाव आले समोर

Maharashtra Politics : CM पदाच्या चर्चेत ट्विस्ट; फडणवीसांच्या निकटवर्तीयाचे नाव आले समोर

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) निकाल लागून आठ दिवस झाले तरी देखील अद्याप राज्यात नवं सरकार स्थापन झालेले नाही. तसेच महायुती सरकारमध्ये (Mahayuti Government) मुख्यमंत्रीपदाचे (CM Post) नाव जाहीर होत नसल्याने नवे सरकार स्थापनेसाठी पेच निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरी अद्याप त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अशातच आता मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत पुन्हा एकदा ट्विस्ट आला असून मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या निकटवर्तीयाचे नाव समोर आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यामुळे पालघर दौरा अर्धवट सोडून रवींद्र चव्हाण दिल्लीत पोहोचले. भाजप सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यासोबत अमित शाह यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल, याची चाचपणी पक्षश्रेष्ठींनी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

तसेच सध्याच्या घडीला भाजप (BJP) मुख्यमंत्री तसेच गृहमंत्रिपद सोडायला तयार नसून, शिवसेनेकडून (शिंदे गट) गृहमंत्रिपदासाठी जोर लावला जात आहे. काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याने गावी गेले असल्याची चर्चा असून चव्हाण यांचे निकटवर्तीय हे शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या गावी गेल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे फडणवीस यांना जर मुख्यमंत्रीपद मिळाले तर चव्हाण यांना गृहमंत्री किंवा महसूल, वित्त मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा आहे.

दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेकडून (Shivsen) १२ मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणी सोबतच विधानपरिषदेच्या सभापतीपदाची देखील मागणी करण्यात आली आहे. मंत्रिपदासह गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी शिंदे यांनी केली आहे. तर पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केल्याचे समजते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...