Monday, December 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

'या' कालावधीत नागपुरात होणार अधिवेशन

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) निकाल (Result) लागून १० दिवस झाले तरी देखील अद्याप राज्यात नवं सरकार स्थापन झालेले नाही. सरकार कधी स्थापन होणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सर्वांनाच प्रश्न पडले आहेत. तर दुसरीकडे महायुती सरकारच्या (Mahayuti Government) पहिल्या हिवाळी अधिवेशनाची तारीख देखील जाहीर झाली आहे. येत्या १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असून प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने यंदा अधिवेशन कमी दिवसांचे राहणार आहे.

- Advertisement -

विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात (Nagpur) हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) तयारीला सुरुवात झाली होती. या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीवर रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या १० दिवसातच हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पहिल्याच अधिवेशनामध्ये यावेळी विरोधीपक्ष नेता नसणार आहे. यंदा आमदारांच्या (MLA) बैठक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले असून डिजिटल आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, नवीन महायुती सरकारचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असून नागपुरात या अधिवेशनाच्या तयारीला गती आली आहे. या हिवाळी अधिवेशनात विशेष म्हणजे आमदारांच्या फायलींचे ओझे कमी होणार आहे. विधानसभा सभागृहात आमदारांच्या आसनासमोर सभागृहाच्या दैनंदिन कामकाजासह इतर माहिती देणारी डिजीटल स्क्रीन बसवण्यात येत आहे. ज्यामुळे आमदारांना सभागृहाच्या कामात सहभागी होताना सर्व माहिती एका क्लिकवर मिळवता येणार आहे. तसेच विधानपरिषदेच्या आमदारांसाठी देखील डिजिटल आसन व्यवस्था असणार आहे.

लाडक्या बहिणींच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली आहे. त्यानंतर आता लाडक्या बहीणींच्या हप्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या