मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामती (Baramati) येथे एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. आज (गुरुवारी) बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथे हजारो नागरिक आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, नितीन गडकरी, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुढील काळात राष्ट्रवादीची दिशा, निर्णय प्रक्रिया आणि राजकीय रणनीती काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू
दुसरीकडे अजित पवारांकडे असलेले उपमुख्यमंत्री पद कोणाकडे सोपवायचे याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच राष्ट्र्वादीच्या नेत्याने (NCP Leader) मोठी मागणी केली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून, त्या पुढे एकत्र असतील यात शंका नाही. अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असल्या पाहिजे. त्यामुळे राष्ट्रवादीची धुरा आता त्याच सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे,” असे झिरवाळ यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Ajit Pawar Funeral : अलविदा दादा! उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
तसेच सगळ्या बारामतीकरांसह महाराष्ट्रातील सगळेजण म्हणत आहेत की सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना आता सत्तेत आणले पाहिजे. ही सर्वसामान्य जनतेची विंनती असल्याने आमचीही तशीच विनंती आहे. दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये सर्वानुमते निर्णय घेतले जातील आणि त्यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असंही नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) म्हणाले.
हे देखील वाचा : Ajit Pawar Funeral : ‘कामाचा माणूस’ गेला! अजितदादांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा वहिनी आणि पवार कुटुंबाला ‘असं’ सावरलं
पटेल, भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची चर्चा
आज अजित पवारांचा अंत्यविधी झाल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना या दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुम्ही स्वीकारावी अशी गळ घातल्याचे बोलले जात आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांचा विचार केला जावा असा प्रस्ताव ठेवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे असे जर झाले तर सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.
हे देखील वाचा : Sanjay Raut : भाजपकडून पानभर जाहिराती देत अजितदादांना श्रद्धांजली, खासदार राऊत भडकले; म्हणाले, “७० हजार कोटीचा आरोप…”
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शशिकांत शिंदे काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज (गुरुवारी) माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, ” हयात असताना अजित पवार हे महापालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असं म्हणाले होते. त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या होत्या. अजित पवार हे सर्व शरद पवारांकडे पाहूनच बोलत होते. त्यामुळे आता त्यादृष्टीनेच आमची वाटचाल होईल,” असं त्यांनी म्हटले आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अंत्यसंस्कारापूर्वी शरद पवारांनी हात जोडले, अन् डोळे…; मन सुन्न करणारे फोटो आले समोर





