Tuesday, October 20, 2026
Homeदेश विदेशमोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला बारामतीमध्ये (Baramati) अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक होते. आज सकाळी बारामतीमध्ये विमानाचा लॅंडिंगदरम्यान अपघात झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार दौऱ्यावर होते. यावेळी बारामतीहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला.

दरम्यान,बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी त्यांनी प्रस्थान केले होते. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते त्या सर्वाचा मृत्यू (Death) झाला.

ताज्या बातम्या

आम्ही संख्याबळ वाढवणार, एकनाथ शिंदेंना…; प्रताप सरनाईकांच्या विधानाची जोरदार चर्चा

0
मुंबई । Mumbai शिवसेनेचा (शिंदे गट) दसरा मेळावा आज मुंबईतील नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे. एकीकडे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू असतानाच,...