Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSandeep Naik : संदीप नाईक यांनी फुंकली तुतारी; भाजपातून तिकीट नाकारल्याने घेतला...

Sandeep Naik : संदीप नाईक यांनी फुंकली तुतारी; भाजपातून तिकीट नाकारल्याने घेतला निर्णय

नवी मुंबई | Navi Mumbai
नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेत तुतारी हाती घेतली . संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेतली. पण त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाला शरद पवार गटातूनच विरोध होत आहे. नाराजीनाट्यानंतर आता राजीनामा सत्र सुरू झाले आहे.

राष्टवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नाईक यांच्यासह २५ पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश यावेळी झाला. विष्णुदास भावे नाट्यगृहात मेळावा झाल्यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. भाजपने बेलापूर मतदारसंघातून तिकीट नाकारल्‍याने भाजपचे नवी मुंबई जिल्‍हाध्यक्ष असलेले संदीप नाईक नाराज होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम करत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

संदीप नाईक बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या संदीप नाईक यांनी आधी अजित पवार गटाकडे तिकिटासाठी मागणी केली. पण तिकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे संदीप नाईक यांनी आता शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळतेय की नाही हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपचे माजी आमदार संदीप नाईक यांचा पक्षप्रवेश झाल्यास १३ तालुका अध्यक्षांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. दिघा ते बेलापूर येथील १३ तालुका अध्यक्ष मुंबईत सिल्व्हर ओककडे रवाना झाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या