Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "गृहखातं अजगरासारखं निपचित…"; महिला डॉक्टरच्या मृत्यूवरून राऊतांचा CM फडणवीसांवर टीकेचा...

Sanjay Raut : “गृहखातं अजगरासारखं निपचित…”; महिला डॉक्टरच्या मृत्यूवरून राऊतांचा CM फडणवीसांवर टीकेचा बाण

मुंबई | Mumbai

सातारा येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Hospital) महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Satara Doctor Suicide) केली. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने, प्रशांत बनकर यांच्यासह एका खासदारांच्या पीएवर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी बनकर याला अटक केली आहे. तर बदने अद्यापही फरार असून, पोलिसांची (Police) पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याच मुद्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्य सरकार आणि गृहखात्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “फडणवीसांचे गृहखात्याकडे लक्ष राहिलेले नाही, राज्यात पोलिस आणि कायद्याचं भय नाही . सरकारची प्रशासनावर पकड नाही, गृहखातं हे अजगरासारखं निपचित पडलं आहे, अशा शब्दात त्यांनी टीकेचा बाण सोडला आहे.

YouTube video player

राऊत पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृहखातं आल्यापासून त्यांचं लक्ष गृहखातं, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा याकडे नसून विरोधी पक्षाविरोधात काय कारवाई करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल याकडे आहे. काल आपण दोन घटना पाहिल्या. फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस खात्यात आहेत. या घटनेमुळे भय कसं नष्ट झालंय, कायद्याविषयी कशी अनागोंदी माजली आहे हे स्पष्ट झाले. दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावरची आहे, एका मुलीवर भररस्त्यात सपासप वार करून तिची हत्या करण्यात आली. नंतर त्या हल्लेखोरानेही आत्महत्या केली, पण मुंबईच्या रस्त्यांवर निर्घृण वार करून मुलीचा जीव घेतला. पोलिसांचा गैरवापर सुरू असल्याने फलटणसह मुंबईसारख्या शहरात दुर्घटना घडताना दिसत आहेत”, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले,”गृहखात्याचा कारभार अत्यंत असंवेदनशीलपणे सुरू आहे. गृहखातं फक्त विरोधकांवर पाळत ठेवणं,त्यांचे फोन टॅप करणं, पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं हेच सुरू आहे. गृहखातं अजगराप्रमाणे निपचिप पडलं आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही, सरकार (Government) काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही. या राज्यातील महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम करण्याऐवजी पोलिस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीने त्यांना वागवले जात आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक महिला आहेत, तरी महिला सुरक्षित नाही. आता त्या सर्व महान महिला नेत्या कुठे गेल्या? दुसरे कोणाचे सरकार असते तर महिलांवरील हल्ले, अत्याचार, खून या विरोधात त्या महिला आमदांरानी (MLA) रस्त्यावर तांडव केलं असतं, मग आता त्या गप्प का आहेत?” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या