Tuesday, January 6, 2026
HomeनगरNagar Panchayat Elections : धक्कादायक! मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप, कुठे...

Nagar Panchayat Elections : धक्कादायक! मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप, कुठे घडली घटना?

नांदेड । Nanded

राज्यातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. एकीकडे प्रशासन शांततेत मतदान व्हावे यासाठी प्रयत्नशील असतानाच, नांदेड आणि अंबरनाथमध्ये अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आले आहेत. मतदारांना प्रलोभन दाखवून मंगल कार्यालयात डांबून ठेवल्याचे गंभीर आरोप करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे मतदानादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील इराणी मंगल कार्यालयात हजारो मतदारांना एकत्र जमवून त्यांना मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जे मतदार भारतीय जनता पक्षाला (भाजप) मतदान करणार नाहीत, अशा मतदारांना हेरून त्यांना प्रलोभन दाखवण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, या मतदारांना “तुम्हाला पैसे दिले जातील, फक्त मतदान करायला जाऊ नका” अशी विनंती करण्यात आली होती. सकाळपासूनच शेकडो मतदारांना या मंगल कार्यालयात थांबवून ठेवण्यात आले होते. “दुपारी चार वाजेपर्यंत सर्वांना पैसे वाटले जातील,” असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते, असा दावा तिथे उपस्थित असलेल्या काही मतदारांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने मंगल कार्यालयात धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचल्यानंतर तिथे कोणताही मोठा वाद पाहायला मिळाला नाही. दरम्यान, या प्रकाराची माहिती प्रसारमाध्यमांना मिळताच, पैसे देण्याचे आमिष दाखवणारे लोक तिथून पसार झाले, असा आरोप मतदारांनी केला आहे. या प्रकारामुळे धर्माबाद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मतदारांमध्ये संतापाची लाट आहे.

नांदेडप्रमाणेच अंबरनाथमध्येही मतदानाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. अंबरनाथमधील कोहोजगाव परिसरातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये २०० हून अधिक महिलांना एकत्र जमवण्यात आले होते. या महिलांना बोगस मतदानासाठी आणले गेल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर केला.

यावरून मॅरेज हॉलबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिलांना तिथे नेमके कोणी आणले होते आणि त्या कशासाठी जमा झाल्या होत्या, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...