Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली 'ही' मोठी...

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

मुंबई | Mumbai

अकरा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह (MLA) भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी ५ याचिका दाखल झाल्या होत्या.

- Advertisement -

नाशिक : शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू

या याचिकांमध्ये (Petitions) १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, शिवसेना कुणाची? राज्यपालांची बहुमत चाचणी बोलावण्याची भूमिका या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. यातील शिवसेना (Shivsena) कुणाची हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पाठवला.

Kerala Boat Tragedy : पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, २१ जणांचा मृत्यू… बचावकार्य सुरू

त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना द्यायचा निर्णय घेतला होता. यानंतर उर्वरित याचिकांवर मार्च महिन्यात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकांवरील निकाल (Result) राखून ठेवला आहे. त्यामुळे हा निकाल आता कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे.

Video : राजस्थानमध्ये लष्कराचं MIG-21 विमान घरावर कोसळलं

तसेच ज्या घटनापीठासमोर राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी झाली ते पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ होते. त्यापैकी एक न्यायमुर्ती एम आर शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. तर १३ मे रोजी शनिवार आणि १४ मे रोजी रविवार असल्याने ८ ते १२ मे दरम्यान निकालाची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या