मुंबई | Mumbai
मे महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडी उघडीप दिली होती. त्यामुळे नागरिकांना (Citizen) काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, यानंतर राज्यात पावसाने (Rain) पुन्हा एकदा जोर धरला असून,नद्या, नाले दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. सध्या अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) ५ ते ९ जुलैदरम्यान वर्तवली आहे.
त्यानुसार पुढील चार दिवसांसाठी हाय अलर्ट (Alert) जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने पुणे (Pune) घाटमाथा परिसरात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर, सातारा आणि कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार असून, पुणे घाटमाथा लगत भागात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर पुणे जिल्ह्यातील इतर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच मुंबईत ‘यलो अलर्ट’ आणि नाशिक घाट माथा भाग, ठाणे व पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यासोबतच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे.
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर (घाटमाथा) या जिल्ह्यांना ५ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
६ जुलै रोजी पुणे (घाटमाथा) परिसरला रेड अलर्ट, कोल्हापूर, सातारा, नाशिक (घाटमाथा), कोकण किनारपट्टी (मुंबई वगळून) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि मुंबई, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे (घाटमाथा), रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक, सातारा (घाटमाथा) या जिल्ह्यांना ७ जुलै रोजी रेड अलर्ट आणि मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच ८ जुलै रोजी रत्नागिरी, गोंदिया, सातारा (घाटमाथा) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर व पुणे (घाटमाथा) या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ९ जुलै रोजी तळ कोकण, सातारा व कोल्हापूर (घाटमाथा), नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.




