Monday, October 5, 2026
HomeनाशिकRain Update : नाशिकसह 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा; बळीराजाला मिळणार दिलासा

Rain Update : नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा; बळीराजाला मिळणार दिलासा

आजचा हवामानाचा अंदाज काय?

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) राज्यात पाठ फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. यानंतर आता गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस बाकी असताना, राज्यभरात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना (Farmer) मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि हवामान प्रणालीतील बदलांमुळे नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या (Nashik District) घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून येथे अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, रत्नागिरी आणि अहिल्यानगरसह पुणे घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच नागपूरसह (Nagpur) यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत नागपूर वेधशाळेतर्फे येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांत संततधार सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आणि विशेषतः घाटमाथ्यावरील प्रवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पिकांना जीवदान आणि तापमानात घट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, या पावसामुळे शेतांमध्ये माना टाकलेल्या पिकांना नवे जीवनदान मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १६.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, या अवकाळी हजेरीमुळे तापमानातही मोठी घट झाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विखे-शिंदे-थोरात एकत्र बसणार!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात...