Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Rain : आजही पावसाचे धुमशान! 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain : आजही पावसाचे धुमशान! ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मुंबई । Mumbai

राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान काही भागांमध्ये गुरुवारी (२५ जुलै) रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने काही जिल्ह्यांना आजही रेड अलर्ट दिला आहे, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर , सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा : भंडारदरात पाऊस सुरूच!

दरम्यान अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्याना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यात ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. तसंच कल्याण डोंबिवलीमधल्या सर्व शाळांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातीलही सर्व माध्यमांच्या शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या पावसाळी धुमाकुळात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात पाच जणांनी जीव गमावला आहे. विद्युत तारांपासून सावध राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रात देशातल्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ताम्हिनी घाटात ५६० मि.मी. पाऊस तर महाबळेश्वर,इगतपुरीतही रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा : मुळा निम्मे भरले; गोदावरीत 14237 क्युसेकने पाणी

सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणंही भरू लागली आहेत. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासलातून ३५ ,३०० क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता ४०,००० क्युसेक इतका विसर्ग होत आहे. कोयनेतून सध्या २०,००० क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. दरम्यान घाटमाथ्यावरील पावसाने दारणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने दारणातून काल सायंकाळी ११९४६ क्युसेकने विसर्ग सुरू होता.

भावली पाठोपाठ कडवा फुल्ल भरले, भावलीतून ८२२ क्युसेक तर कडवातून ८०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. हे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून सायंकाळी ११०७९ क्युसेकने तर रात्री १० वाजता १४,२३७ क्युसेकने विसर्ग गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे.

हे ही वाचा : मुळा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या