Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट; थेट आदेश काढला

मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट; थेट आदेश काढला

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधीच मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यात धर्मांतरासंदर्भातील नव्या कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 28 ऑगस्टपासून राज्यभरात लागू होणार आहे. याबाबत राज्याच्या गृह विभागाकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्याच्या गृह विभागाने 17 ऑगस्ट रोजी ही अधिसूचना जारी केली आहे.

Notification No. NAX-0724/C.R.240/Spl-1B नुसार महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026 मधील तरतुदी लागू करण्यासाठी 28 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी रक्षाबंधन असल्याने सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट देण्यात आले. राज्यपालांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने गृह विभागाचे उपसचिव प्रितमकुमार जावळे यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर तो अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आला. आता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपासून हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल.

- Advertisement -

बळजबरीच्या बेकायदेशीर धर्मांतराविरोधात कारवाई करता येणार
बळजबरी, फसवणूक, आमिष, खोटी माहिती किंवा लग्नाचे आश्वासन देऊन करण्यात येणारे धर्मांतर रोखणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये या कायद्यानुसार कारवाई करता येणार आहे.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तुकाराम मुंढेंच कौतूक, एफडीएची अशी धडक कारवाई…

सात वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतुद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाने मंजूर केला होता. त्यानंतर विधेयक राज्यपालांकडे आणि पुढे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे २८ ऑगस्टपासून राज्यातील बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याचा दणका बसणार आहे.

ताज्या बातम्या

Accident News : अज्ञात वाहनाची बुलेटला धडक; माळीचिंचोराचे तिघे जागीच ठार

0
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील पुनतगाव फाटा येथे बुलेटला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या...