Wednesday, April 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजState Cabinet Meeting: साताऱ्यात आय टी पार्कला जमीन, शिक्षकांना विद्यापीठ अनुदान; महायुती...

State Cabinet Meeting: साताऱ्यात आय टी पार्कला जमीन, शिक्षकांना विद्यापीठ अनुदान; महायुती सरकारचे चार मोठे निर्णय

मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (22 एप्रिल) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण धोरणासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तर राज्यातील सात आदर्श महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना सुखावणारा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील आयटी पार्कसाठी जमीन देण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)-

- Advertisement -

१) प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवणार. या वर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार.
(नगर विकास विभाग )

२) राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार. या पदावरील शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार.
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

Girish Mahajan: इथून चालते व्हा…; कालच्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

३) सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येणार. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार – व्यवसायाच्या संधी.
(महसूल विभाग)

४) राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग – २ मधून भोगवटादार वर्ग – १ मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना. याबाबतची अधिसूचना काढण्यास मान्यता.
(महसूल विभाग)

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (Nashik Regional Transport Office) सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात (Strike) सहभाग घेतल्यामुळे मंगळवारपासून कार्यालयातील कामकाज पूर्णपणे...