Saturday, April 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGirish Mahajan: इथून चालते व्हा…; कालच्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया,...

Girish Mahajan: इथून चालते व्हा…; कालच्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai
महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (21 एप्रिल) वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामुळे जांबोरी मैदान परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि त्या महिलेच्या रागाचा सामना मंत्री गिरीश महाजन यांना करावा लागला. सदर महिलेनं गिरीश महाजनांवर प्रश्नांचा भडिमार केला. या दरम्यानचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेवर गिरीश महाजन काय म्हणाले?
मुंबईत काल घडलेल्या घटनेनंतर आज माध्यमांशी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला. यावर वाहतूक कोडींमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्च्यामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाट्टेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलीस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचे होते, असे गिरीश महाजन म्हणाले. त्यांना तसं बोलायला नाही पाहिजे होतं. पोलिसांना त्यांनी तक्रार द्यायला पाहिजे होती. मी त्याठिकाणी उपस्थित होतो. तिथेही त्या आल्या आणि रस्ते तुम्ही बंद कसे करू शकता? त्या आक्षेपार्ह भाषेत बोलत होत्या आणि ते मी आता सांगू शकत नाही.

- Advertisement -

Rohit Pawar: ‘हजारोंसे भारी…एक नारी’! रोहित पवारांकडून त्या महिलेचे कौतूक; म्हणाले, अशा शेकडो ‘नारी शक्ती’…

नको त्या भाषेत वाद घातला
गिरीश महाजन म्हणाले की, पोलिसांनी त्या महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी पोलिसांसोबतसुद्धा नको त्या भाषेत वाद घातला. परंतु आम्ही सर्वांनी अतिशय संयमाची भूमिका घेतली होती. मी त्यांना सांगितलं की, आम्ही पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये रस्ता मोकळा करू. पण ती महिला अजिबात ऐकायला तयार नव्हती. त्या महिलेने पाण्याची बाटली मोर्चावर फेकून मारली. हे सर्व व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे आमच्याही महिला कार्यकर्त्या संतापल्या होत्या. पण आम्ही त्यांना सांगितलं की, त्या महिलेला बोलू द्या. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये ती महिला निघून गेली. एवढाच प्रकार त्याठिकाणी झालेला आहे.

यापुढे निश्चित काळजी घेऊ
पण कालचा मोर्चा महिलांसाठीच आणि महिला आरक्षणासाठी निघालेला होता. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्या महिलेला खूप राग अनावर झालेला होता. त्यामुळे ती बोलत होती. पण यापुढे निश्चित आम्ही काळजी घेऊ. मोर्चा किंवा आंदोलन असेल तेव्हा असे प्रकार नेहमी घडत असतात. पण पुन्हा मी सांगेल की, आम्ही यासंदर्भामध्ये यापुढे अधिक काळजी घेऊ. पण ती महिला जे काही बोलली ती असंसदीय भाषा नव्हती. त्यांनी त्यांचा मुद्दा वेगळ्या प्रकारे मांडायला पाहिजे होता. आम्ही मोर्चाची परवानगी घेतली होती. मोर्चाचा रुटही आम्ही दिलेला होता. त्यामुळे मला असं वाटतं की, त्याठिकाणी लोकांना काही त्रास झाला असेल. पण प्रत्येक मोर्चावेळी लोकांना त्रास होत असतो, हेही खरे असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

नेमके काय प्रकार घडला?
सदर महिलेने गिरीश महाजनांसमोर संताप व्यक्त केला. तुमचं हे काय चाललंय?, इथून चालते व्हा…शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विरोध करायचाच तर तो मैदानात करा, वाहतूक कोंडी का करत आहात?, असा सवालही महिलने उपस्थित केला. संतापलेल्या महिलेने उपस्थित असणाऱ्या पोलिसांना देखील सवाल केला. इतकी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेत आहात?, असा प्रश्न महिलेने पोलिसांना विचारला.

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...