Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्याने गाठला ५ कोटी लस मात्रांचा टप्पा

राज्याने गाठला ५ कोटी लस मात्रांचा टप्पा

मुंबई | प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेत सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण मात्रांची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभऱात उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) पाठोपाठ महाराष्ट्राने (Maharashtra) ही विक्रमी कामगिरी केली आहे…

- Advertisement -

१४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या