नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
नगर व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी असलेले प्रादेशिक सह संचालक (साखर) यांच्या आधिपत्याखाली येणार्या अहिल्यानगर विभाग ऊस गाळपात राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात 13 सहकारी आणि 9 खाजगी असे एकूण 22 कारखाने सुरु झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी 20 नोव्हेंबर अखेर 15.76 लाख टन उसाचे गाळप करून 10.59 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. अहिल्यानगर विभागाचा साखर उतारा 6.72 टक्के आहे. महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबर अखेर 150 कारखान्यांकडून 125.67 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे.
महाराष्ट्रात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालया तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात दि. 20 नोव्हेंबर अखेर 80 सहकारी व 70 खाजगी अशा एकूण 150 साखर कारखान्यानी 125.67 लाख टन उसाचे गाळप झाले. 93.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.74 टक्के आहे. कोल्हापूर विभागात 31.64 लाख टन उसाचे गाळप करून कोल्हापूर विभागाने 27.23 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा 8.61 टक्के इतका आहे. विभागात 21 सहकारी आणि 10 खासगी असे 31 कारखाने सुरु आहेत. ऊस गाळप आणि साखर उतार्यात कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर आहे.
पुणे विभागात पुणे विभागात 16 सहकारी आणि 8 खाजगी असे एकूण 24 कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत 29.76 लाख टन उसाचे गाळप करून 23.98 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा 8.06 टक्के आहे. सोलापूर विभाग- ऊस गाळपात तिसर्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 12 सहकारी आणि 20 खाजगी असे एकूण 32 कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात 28.85 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 19.65 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा 6.81 टक्के इतका आहे. अहिल्यानगर विभाग- अहिल्यानगर विभागातील 13 सहकारी आणि 9 खाजगी असे एकूण 22 कारखाने सुरु झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी 20 नोव्हेंबर अखेर 15.76 लाख टन उसाचे गाळप करून 10.59 लाख क्विंटल साखर उत्पादित केली असून सरासरी साखर उतारा 6.72 टक्के आहे.
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर विभागात 9 सहकारी व 6 खाजगी अशा 15 कारखान्यानी 10.41 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 6.43 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा 6.18 टक्के इतका आहे. नांदेड विभाग- नांदेड विभागात 9 सहकारी व 15 खाजगी अशा 24 कारखान्यानी 8.25 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 5.28 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा 6.4 टक्के इतका आहे. अमरावती विभाग- अमरावती विभागातील 2 खाजगी कारखाने सुरु असून 1 लाख टन उसाचे गाळप करून 0.77 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 7.7 टक्के आहे.
नागपूर विभाग- नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झालेला नाही. मागील वर्षी याच काळात 17.61 लाख टन उसाचे गाळप होऊन 8.41 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात गाळप झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यानी दि.20 नोव्हेंबर अखेर 14 लाख 80 हजार 723 मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन 9 लाख 75 हजार 320 साखर पोती उत्पादित केली. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 6.59 टक्के आहे.
जिल्ह्यातील इतर कारखान्यांचे ऊस गाळप मेट्रिक टन व कंसात साखर उत्पादन (पोती)- ज्ञानेश्वर 144390 (108600), मुळा 133580 (84950), संजीवनी 42624 (23525), कोळपेवाडी 79520 (63175), गणेश 17000(4250), अशोक 53800 (37600), प्रवरा 91550 (47100), श्रीगोंदा 125280 (104100), संगमनेर 98250 (73230), वृध्देश्वर 44180 (28300), अगस्ती 28383 (19400), क्रांती शुगर 29615 (24250), अंबालिका 289025 (174600), गंगामाई 129530 (50700), प्रसाद शुगर 59770 (52650), बारामती अॅग्रो 51835 (42500), स्वामी समर्थ 39650 (26639), ढसाळ अॅग्रो 22739(9760).





