मुंबई । Mumbai
राज्यातील विधान परिषदेच्या (Maharashtra Vidhan Parishad Bypoll 2025) रिक्त पाच जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. यात तीन जागा भाजप, एक राष्ट्रवादी तर एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली आहे.
शिवसेनेतर्फे नंदुरबारचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जातात. संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या अमरावती मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यामुळे आता विधीमंडळात पती-पत्नी एकत्र दिसणार आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर संजय घोडके यांनी त्यांना साथ दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटकर यांच्या जागी खोडके यांना संधी मिळणार आहे.
शिवसेनेतर्फे नंदुरबारचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या राजकीय वनवास संपण्याची चिन्हे आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना रिक्त जागांसाठी चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र त्या नावांपैकी काही नावांना राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी विरोध केल्याने चंद्रकांत रघुवंशी यांची आमदारकी रखडली होती.
दरम्यान, महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. भाजपकडे विधान परिषद निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.