Monday, June 1, 2026
Homeमुख्य बातम्याMaharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर; काँग्रेस,...

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर; काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि ठाकरे सेनेकडून कुणाला संधी?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान (Voting) होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (सोमवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचे (Mahayuti) जागावाटप निश्चित झाले असून, उमेदवार देखील घोषित करण्यात आले आहेत. यात भाजपच्या (BJP) वाट्याला ११, शिंदे सेनेच्या चार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. दुसरीकडे मविआचे देखील जागावाटप घोषित झाले असून, काँग्रेस आठ, शिवसेना उबाठा चार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तीन जागांवर निवडणूक लढणार आहे. तर दोन जागांवर अजूनही एकमत होत नसल्याने त्याचा पेच काही तासांत सुटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) काँग्रेसने चंद्रपूर-वर्धा-गडचिरोलीतून शैलेश देशमुख, अमरावतीमधून हर्षदीप देशमुख, यवतमाळतून साहेबराव कांबळे, लातूरमधून महेश देशमुख, सोलापूरमधून आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच इतर ठिकाणचे उमेदवार काँग्रेसकडून अगदी शेवटच्या क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेने नाशिकमधून माजी आमदार अनिल कदम, परभणी-हिंगोलीतून डॉ.विवेक नावंदर आणि छत्रपती संभाजीनगर-जालनातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी कृष्ण पाटील डोणगावकर, जळगावमधून शरद तायडे, रत्नागिरी-सिंधुदुर्गतून माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Vidhan Parishad Election : महायुती-मविआमध्ये नाशिकची जागा शिवसेनेकडे; माजी आमदारांना उमेदवारी, गणेश गितेंच्या भूमिकेकडे लक्ष

तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP Sharad Pawar) सांगली-सातारामधून अभय जगताप आणि बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार हे दोघेही अर्ज भरणार असून, त्यापैकी एक उमेदवार निश्चित होईल. तर पुण्यातून श्रीकांत पाटील आणि ठाणे मतदारसंघातून आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय आणि नगरसेवक अभिजित पवार यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीच्या उमेदवारांची यादी

भाजप

१) वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी २) भंडारा-गोंदिया-अविनाश ब्राह्मणकर ३) अमरावती- प्रवीण पोटे ४) सोलापूर- राजेंद्र राऊत ५) सांगली सातारा- धैर्यशील कदम ६) अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे ७) छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट ८) नांदेड – अमर राजूरकर ९) धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील १०) जळगाव- नंदकिशोर महाजन ११) नागपूर- राजीव पोतदार

शिंदे सेना

१) नाशिक – नरेंद्र दराडे, २) ठाणे- रवींद्र फाटक ३) परभणी-हिंगोली- सईद खान ४) यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी, किरण पांडव,सलीम खातून (संभाव्य)

अजित पवार राष्ट्रवादी

१) पुणे – विक्रम काकडे २) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग-अनिकेत तटकरे

ताज्या बातम्या

Nashik Crime News : विषारी दारूनंतर आली जाग; नाशिकला चार दिवसांत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पुण्यातील (Pune) हडपसर व पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे २१ निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. या भीषण...