Tuesday, November 19, 2024
Homeराजकीयबेईमान लोकांना बाहेरचा रस्ता दाखवणार; नाना पटोले प्रंचड संतापले!

बेईमान लोकांना बाहेरचा रस्ता दाखवणार; नाना पटोले प्रंचड संतापले!

मुंबई । Mumbai

राज्यात काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला आहे. शरद पवार गटाने पुरस्कृत केलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा काल पराभव झाला.

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसकडे ३७ मते होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची केवळ २५ मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची उर्वरित १२ मते फुटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच संतापले आहेत. ज्या लोकांनी पक्षाशी बेईमान केली, अशा लोकांना काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

हें देखील वाचा : नारायण राणेंच्या खासदारकीला थेट हायकोर्टात आव्हान

नाना पटोले म्हणाले की, ‘हंडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस मतं फुटली होती. त्यावेळेस बदमाश लोकं आयडेंटीफाय झाली नव्हती. पण यावेळेस ट्रॅप आम्ही लावला होता आणि त्यात हे आमदार सापडले आहेत. हायकमांडला ही बाब कळवली आहे. त्यामुळे लवकरच पक्ष विरोधी काम करणाऱ्या, गद्दारी करणाऱ्यांना अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितले आहे.

या निवडणुकीत आम्ही ट्रॅप लावला होता. हे आमदार या ट्रॅपमध्ये फसले आहेत. त्यामुळे मतं न देणाऱ्या या आमदारांवर कारवाई होणार आहे. यासाठी आता कुठलीही कमिटी नेमणार नाही तर थेट कारवाई होणार आहे. आणि हायकमांडचा आदेश आला तर नावं देखील कळतील, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. पक्षात काही विश्वासघातकी लोकं असतात त्या विश्वासघाती लोकांना आता मी असा धडा शिकवणार की पुढच्या काळात कृत्य करण्याचा प्रयत्न करणार नाही. असी अॅक्शन आम्ही घेणार आहोत असेही नाना पटोले म्हणाले आहेत.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या