Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; पाहा कुणाचा समावेश?

मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; पाहा कुणाचा समावेश?

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजपने (BJP) तीन ते चार दिवसापूर्वी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) ४५ उमेदवारांची पहिल्या यादीची घोषणा झाली होती. यानंतर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (NCP Ajit Pawar) ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही यादी घोषित केली आहे.

- Advertisement -

या यादीनुसार पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) हे बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढणार आहे. तर येवला-छगन भुजबळ, इगतपुरी- हिरामण खोसकर, सिन्नर – माणिकराव कोकाटे, अमळनेर – अनिल पाटील, दिंडोरी- नरहरी झिरवाळ, अमरावती शहर-सुलभा खोडके, परळी-धनंजय मुंडे, पिंपरी-अनिल बनसोडे, मुंब्रा-कळवा-नजीम मुल्ला, तुमसर-राजू कारेमोरे, नवापूर – भरत गावित, अर्जुनी मोरेगाव-राजकुमार बडोले, जुन्नर-अतुल बेनके, पुसद-इंद्रनील नाईक, मोहोळ-यशवंत माने यांना संधी मिळाली आहे.

तर वसमत-चंदकांत नवघरे, पाथरी-निर्मला विटेकर, आंबेगाव-दिलीप वळसे पाटील, इंदापूर-दत्ता भरणे, हडपसर-चेतन तुपे, देवळाली-सरोज आहिरे, माजलगाव-प्रकाश सोळके, कागल-हसन मुश्रीफ, वाई- मकरंद पाटील, कळवण-नितीन पवार,मावळ- सुनील शेळके, अहिल्यानगर शहर-संग्राम जगताप, अहेरी-धर्मरावर बाबा अत्राम,श्रीवर्धन-आदिती तटकरे, उदगीर-संजय बनसोडे, खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील, अहमदपूर-बाबासाहेब पाटील, शहापूर- दौलत दरोडा, कोपरगाव-आशुतोष काळे, अकोले-किरण लहामटे,चिपळूण-शेखर निकम,चंदगड-राजेश पाटील, या नावांचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...