Friday, November 22, 2024
HomeराजकीयShahajibapu Patil : "गुलाल नाय उधळला तर फाशी…"; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना...

Shahajibapu Patil : “गुलाल नाय उधळला तर फाशी…”; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून सर्व ४० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात शिंदेंच्या बंडामध्ये अग्रभागी असलेले शहाजीबापू पाटील यांना पुन्हा एकदा सांगोल्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता शहाजी बापू पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चॅलेंज दिलं आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

यावेळी बोलतांना शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले की, “संजय राऊत (Sanjay Raut) हा महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत, मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही, माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही. असे म्हणत पाटील यांनी आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा (Won) गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असा ओपन चॅलेंज दिला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पहिल्या दिवशी ११८ अर्ज विक्री; इच्छुकांमध्ये उत्साह

तसेच खेड-शिवापूर टोलनाक्यावर इनोव्हामध्ये सापडलेल्या ५ कोटींबाबतही शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की ,”पुणे (Pune) येथे सापडलेले पैसे हे रफिक शेख यांचे होते त्यांनी ते कबूलही केले असून ते मोठे व्यापारी आहेत. त्यांचे पैसे आहेत, अशी जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हे पैसे एका व्यापाऱ्याचे असताना विनाकारण एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार करत आहेत. पाठवलेले पैसे पाच कोटीपेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का?”, असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या