Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात लहरी हवामान, आज आणि उद्या पावसाची शक्यता... काय आहे हवामान विभागाचा...

राज्यात लहरी हवामान, आज आणि उद्या पावसाची शक्यता… काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या काही दिवसात राज्यभरातील हवामानात मोठे बदल बघायला मिळत आहेत. काही भागात कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे तर काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. तरी जानेवारी संपूर्ण महिनाभरातचं राज्यातील विविध भागात कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद झाली असुन संपूर्ण महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. तरी आता थंडी पाठोपाठचं राज्यभरात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आज आणि उद्या काही ठिकाणी तुरळक पावसाची देखील शक्यता आहे. अशा या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. पावसाच्या आगमने थंडीचा प्रभाव काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तली जात आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील सात अशा १७ जिल्ह्यात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या काही ठिकाणी तुरळक पावसाची देखील शक्यता आहे. त्यामुळं मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा प्रवाभ कमी होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह कोकण आणि विदर्भात जाणवत असलेला थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

राज्यात औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, पुणे या जिल्हात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्याने रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भुसावळ तालुक्यासह परिसरात धुक्याची चादर पसरली आहे.

बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू. हरभरा. कांदा यासह केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडी जाणवत असून या बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

- Advertisment -

ताज्या बातम्या