Tuesday, January 6, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Update : आज राज्यात मुसळधार! 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

Weather Update : आज राज्यात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | Mumbai

यंदा राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली (Weather Update) आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही राज्यात पावसाचा जोर (Heavy Rain) कायम राहणार असल्याचा अदांज हवामान विभागाने वर्तवविला आहे.

- Advertisement -

आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यात कुठं ऑरेंज (Orange alert) तर कुठं यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज हवामान विभागानं (IMD) सावधानतेचा इशारा दिला आहे.

YouTube video player

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग य तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा :  संतापजनक! दिवसाढवळ्या फूटपाथवर महिलेवर अत्याचार होत होता अन् लोक…

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा : आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याचा मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाचा मृत्यू

यावर्षी भारतामध्ये पाऊस हा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्य़ंत राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर कमी दाबाची प्रणाली विकसित होऊन भारतातील पाऊस त्याच महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतात जून महिन्यात सुरुवात झाल्यानंतर साधारणपणे सप्टेंबरमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून पाऊस सुट्टी घेतो. मात्र, यावेळी मान्सून लवकर परतण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...