मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने (Rain) जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अक्षरक्षा झोडपून काढले होते. मात्र,ऑगस्ट महिना सुरु होताच राज्यातील अनेक भागांत पावसाने काहीशी दडी मारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बरेचसे नागरिक उन्हाच्या उकाड्याने हैराण झालेले पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात (State) पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar : भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवले काळे झेंडे; महायुतीमध्ये वादाची ठिणगी?
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा पुढील आठवड्यापासून पावसाचे पुनरागमन होणार आहे. तर आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी (Citizen) योग्य ती खबरदारी बाळगावी असे, आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : दंगलखाेर निघाला ‘एमडी’ डिलर; शहरात दाेन टाेळ्यांचे रॅकेट उघड
दरम्यान, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. तसेच मागील २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मुंबईतील (Mumbai) कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा