Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

राज्यातील ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये अनेक बदल होताना दिसत आहेत. अशातच राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच, राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात थंडीची लाट २ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तथापी, किरकोळ तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना मोठ नुकसान सहन कराव लागू शकतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या