Friday, October 2, 2026
Homeनगरगणोरे शिवारात एकाचवेळी तीन बिबट्यांचा संचार

गणोरे शिवारात एकाचवेळी तीन बिबट्यांचा संचार

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील वीरगाव येथे बिबट्याने दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच घटना घडलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर दुसरीकडे गणोरे शिवारातील धामोडी फाट्याजवळ एकाचवेळी तीन बिबट्यांचा संचार दिसून आला. छायाचित्रकार तेजस तोरमल यांनी रात्री सव्वाबाराच्या आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यात हे चित्र कैद केले आहे.
तेजस तोरमल हे गणोरेहून पिंपळगाव निपाणीकडे आपल्या चारचाकी वाहनातून चालले होते.

- Advertisement -

यावेळी धामोडी फाटा परिसरातील मारुती काळे यांच्या राहत्या घरासमोरील पाण्याच्या टाकीजवळ एकाचवेळी तीन बिबटे दिसले. त्यामुळे रस्त्यातच काही काळ थांबावे लागले. यावेळी गाडीतूनच त्या बिबट्यांचे तोरमल यांनी आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रण घेतले. याच मार्गावर समर्थनगर व काळे वस्ती परिसरात बिबट्यांचा नेहमीच वावर वाढल्याने या परिसरातील शेतकरी देखील दहशतीखाली राहत आहे. त्यामुळे वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....