Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजHSC Result : राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ तर नाशिक विभागाचा ९४.७१ टक्के

HSC Result : राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ तर नाशिक विभागाचा ९४.७१ टक्के

कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी

नाशिक | Nashik

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर करण्यात आला आहे. दुपारी एक वाजेपासून विद्यार्थ्यांना (Student) प्रत्यक्षात निकाल ऑनलाईन (Online) पाहता येणार असून बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विभागनिहाय निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

यामध्ये यंदा राज्याचा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी (Girl) बाजी मारली आहे. तसेच यंदाही निकालात कोकण विभागाने (Konkan Division) बाजी मारली असून ९१.५१ टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर ९१.८५ टक्क्यांसह सर्वात शेवटी आहे.

तसेच नाशिक विभागाचा (Nashik Division) निकाल ९४.७१ टक्के, पुणे विभाग ९४.४४ टक्के, लातूर ९२.३६ टक्के, कोल्हापूर ९४.२४ टक्के, अमरावती ९३ टक्के, छत्रपती संभाजीनगर ९४.०८ टक्के, नागपूर ९३.१२ टक्के, मुंबई ९१.९५ टक्के इतका लागला आहे. यात ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० टक्के इतकी आहे.

दरम्यान, यंदा नाशिक विभागात एकूण १,५८, १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १,५७,३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १,४९,०२९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातून उत्तीर्ण झाले आहेत.त्यामुळे
नाशिक विभागाचा यंदाचा निकाल ९४.७१ टक्के इतका लागला आहे.

कोणत्या शाखेचा किती टक्के निकाल?

नाशिक विभागात कला शाखेचा निकाल ८८.१३ टक्के लागला आहे. तर वाणिज्य शाखेचा ९५.२१ आणि विज्ञान शाखेचा ९८.७४ टक्के इतका निकाल लागला आहे. तसेच आयटीआयचा ९४.०१ टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८८.६२ टक्के इतका निकाल लागला आहे. यामध्ये सर्वात जास्त निकाल विज्ञान शाखेचा निकाल लागला असून त्यात ९६.३२ टक्के मुली आणि ९३.३९ टक्के मुलांचा समावेश आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या