Sunday, February 15, 2026
Homeमुख्य बातम्याMahashivratri 2026 : महाशिवरात्रीमुळे मंदिरे गजबजली; त्र्यंबकला दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीमुळे मंदिरे गजबजली; त्र्यंबकला दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा

नाशिक | Nashik

महाशिवरात्री (Mahashivratri 2026) निमित्त जिल्ह्यातील सर्वच शिव मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. पहाटेपासूनच मंदिरांत भाविकांनी मोठी गर्दी केली असून, दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) आज (रविवारी) पहाटे चारपासूनच भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण त्र्यंबकनगरी ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’ च्या घोषणांनी दुमदुमली होती.

- Advertisement -

काल (शनिवारी) म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये एक लाखपेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते. आज (रविवारी) ही संख्या अधिक वाढणार आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टकडून भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून महाशिवरात्रीदरम्यान महत्त्वाच्या व्यक्तींचे (VIP) दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सोमवारी रात्री नऊपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवले जाणार आहे. यामुळे भाविकांना सलग चार दिवस त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुलं असणार आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर सलग 41 तास खुलं राहणार

दरम्यान, यंदा महाशिवरात्रीच्या अनुषंगाने अधिकाधिक भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार भाविकांना (Devotees) दर्शनासाठी पूर्व दरवाजा दर्शनबारी येथून प्रवेश देण्यात येईल. १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहापर्यंत त्र्यंबकेश्वर येथील स्थानिक भाविकांना पश्चिम दरवाजातून आधारकार्ड दाखवून मंदिराच्या पश्चिम दरवाजातून प्रवेश करता येणार आहे. तसेच दर्शन झाल्यावर मंदिराच्या दक्षिण दरवाजातून बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे भाविकांनी देवस्थानास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

‘शिव तांडव ग्रुप’तर्फे अघोर नृत्या सादरीकरण

आज (रविवारी) महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला ज्योर्तिलिंगावर अभिषेक, दुपारी तीन वाजता श्री त्र्यंबकराजाची पालखी मिरवणूक. तीर्थराज कुशावर्त येथे विधिवत पूजा, रात्री मंदिरात पुन्हा महापूजा होईल. यानंतर पालखी सोहळ्यादरम्यान ’शिव तांडव ग्रुप’तर्फे अघोर नृत्या सादरीकरण मंदिर पटांगणात होणार आहे.

कपालेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Temple) देखील आज पहाटेपासून भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मंदिर प्रशासनाने पहाटे चार वाजेपासून‎ रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर भविकांना‎दर्शनासाठी खुले ठेवण्याचा महत्त्वपूर्ण‎ निर्णय घेतला आहे. तर सायंकाळी ४ वाजता कपालेश्वराची पालखी काढण्यात येणार‎आहे.

शिव मंदिरे गर्दीने गजबजली

महाशिवरात्री हा हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा सण आहे. देशभरात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो. तसेच शिव मंदिरांना आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात येते. शिव भक्तांच्या या मोठ्या गर्दीमुळे मंदिरे गजबजल्याचे पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

Nashik BJP News : आमदार फरांदेंच्या नेतृत्वात भाजप युवा मोर्चाचे काँग्रेस...

0
नाशिक | Nashik काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सपकाळ यांनी टिपू...