Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक २०२४ : महाविकास आघाडीत देवळालीतील उमेदवारी ठाकरे गटाला

विधानसभा निवडणूक २०२४ : महाविकास आघाडीत देवळालीतील उमेदवारी ठाकरे गटाला

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

संपूर्ण नाशिक रोड करांचे लक्ष लागलेल्या देवळाली मतदारसंघाची जागा अखेर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची देवळाली ची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार असल्याचे जोरदार चर्चा होती तसेच देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने मेळावा घेऊन या जागेवर आपलाच उमेदवार असणार असे जाहीर केले होते परिणामी त्यानंतर तुतारी कडून उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटासह इतर पक्षातील उमेदवार सुद्धा इच्छुक होते.

दरम्यान देवळाली ची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी म्हणून गेल्या पाच ते सहा दिवसापासून देवळाली मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई मध्ये तळ ठोकून बसले आहे परिणामी आज झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेअंती सदरची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला मिळाली असल्याचे विश्वसनीय वृत्त असून या जागेवर माजी आमदार योगेश घोलप यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.

दरम्यान या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने नाशिक शहरातील तीन जागा आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे या अगोदर शहरातील मध्य व पश्चिम या दोन्ही जागेवर वसंत गीते व सुधाकर बडगुजर यांचे उमेदवारी अगोदरच घोषित करण्यात आली आहे.

दरम्यान माजी मंत्री बबनराव घोलप येत्या दोन दिवसात शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे कळते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या