Friday, November 22, 2024
Homeराजकीयमहायुतीचा राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा 'असा' आहे फॉर्म्युला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'या'...

महायुतीचा राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा ‘असा’ आहे फॉर्म्युला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची शिफारस

मुंबई | Mumbai

मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल (Governor) नामनिर्देशित विधान परिषदेच्या १२ जागा भरण्यासाठीच्या हालचालीला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) आचारसंहिता लागण्यापूर्वी या १२ आमदारांची (MLA) नियुक्ती होण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीनंतर आता महायुतीचे राज्यपाल नामनिर्देशित जागा वाटपाचे सूत्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : ‘लाडकी बहीण योजने’वरून शिंदे-पवारांमध्ये श्रेयवादाची लढाई? शिवसेनेची नाराजी

मिळालेल्या माहितीनुसार,विधानपरिषदेच्या १२ जागांपैकी तिन्ही पक्षाला ४-४ जागा येणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने ६ जागा घेतल्या असून शिवसेना शिंदे गटाला (Shivsena Shinde Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला प्रत्येकी ३-३ जागा देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातील याचिका प्रलंबित आहे. ‘गेली काही वर्षे सदस्य का निवडले नाहीत? आता तरी सदस्य नेमणार का?’, अशी विचारणा न्यायालयाने केली असता सरकारी वकिलांनी येत्या काही दिवसात प्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या प्रक्रियेला वेग आला असून तिन्ही पक्षातील काही नावे समोर आली आहेत.

हे देखील वाचा : Hasan Mushrif on Sharad Pawar : “पवारसाहेब आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं..”; विधानसभेसाठी मुश्रीफांनी दंड थोपटले

दरम्यान, यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मुंबै बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि ठाण्याचे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नावांची शिफारस केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावर अद्याप पक्षाकडून अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

हे देखील वाचा :  सणासुदीच्या तोंडावर काढणीला आलेलं पीक गेलं, शेतकरीही ‘लाडका’ असल्याचं…; राज ठाकरेंचं ट्विट चर्चेत

भाजपकडून या नावांची चर्चा

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार सुधाकर कोहळे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर आणि अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले

हे देखील वाचा : १९७७ चा दाखला देत शरद पवारांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य!

महायुतीची विधानपरिषदेतील संख्या वाढणार

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीनंतर विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे. ७८ सदस्य असलेल्या या सभागृहात सध्या २७ जागा रिक्त आहेत. त्यात राज्यपाल नियुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर पाठवायच्या जागांचा समावेश आहे.विधानपरिषदेत महायुतीला समर्थन देणाऱ्या अपक्षांसह सध्या महायुतीचे ३४ आमदार आहेत. तसेच महाविकास आघाडीचे १७ आमदार आहेत. तर १२ सदस्यांच्या नियुक्तीनंतरही १५ जागा रिक्त असणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या