Friday, September 20, 2024
HomeराजकीयHasan Mushrif on Sharad Pawar : "पवारसाहेब आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत...

Hasan Mushrif on Sharad Pawar : “पवारसाहेब आपसे बैर नहीं, लेकिन समरजीत तेरी खैर नहीं..”; विधानसभेसाठी मुश्रीफांनी दंड थोपटले

मुंबई | Mumbai

- Advertisement -

भाजपाचे (BJP) कागल विधानसभेचे (Kagal Vidhan Sabha) नेते समरजित घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्र सोडले होते.

लाचरीचा स्वीकार करणाऱ्यांना कागलकर धडा शिकवणार आणि साथ देण्याऐवजी सोडून जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असे आव्हान कागलमधून शरद पवार यांनी दिले होते. यावर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ (Ajit Group Pawar Leader Hasan Mushrif) यांनी प्रतिआव्हान दिले आहे.

हे ही वाचा : १९७७ चा दाखला देत शरद पवारांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य!

माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीचं वय २५ च्या वर झाले की, तो निवडणुक लढू शकतो. आता तर ७ पक्ष झाले आहे. त्यामुळे उमेदवाराची मांदियाळी. यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की शरद पवार माझे दैवत आहेत. परंतु पवार साहेब माझ्या मागे का लागले आहेत? हे मला कळत नाही. ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

हे ही वाचा : …आपल्या अंगाला भोकं पडत नाही; सुप्रिया सुळे यांच्या टिकेला अजित पवारांचे…

शरद पवार माझ्या ६ निवडणुकांमध्ये आले होते. ते नेहमी म्हणायचे ती राजा विरोधात प्रजा जिंकली पाहीजे. तेच, मी पुन्हा म्हणत आहे असं मुश्रीफ म्हणालेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हसन मुश्रीफ यांनी दंड थोपाटले आहेत. निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नही, समरजीत तेरी खैर नही असं म्हणत त्यांनी घाटगेंना खुलं आव्हान दिलंय.

हे ही वाचा : …याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का?; नेहरूंचं नाव घेत फडणवीसांचा ठाकरेंना…

- Advertisment -

ताज्या बातम्या