Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकPolitical News : महायुतीच अखेर ठरल! राज्यात ५ डिसेंबरला स्थापन होणार नवं...

Political News : महायुतीच अखेर ठरल! राज्यात ५ डिसेंबरला स्थापन होणार नवं सरकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत होणार शपथविधी

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबरला लागल्यानंतर महायुतीतील भारतीय जनता पार्टी; शिवसेना ( एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट) यांचे कडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. यात भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त आमदार निवडणून आल्याने सता स्थापन करताना अनेक घडामोडी दिसून येत आहेत. दरम्यान परवा दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची अमित शहा यांच्या सोबत बैठक पार पडली. त्या बैठकीतही भाजपाच्या गट नेत्याची निवड दोन दिवसात होईल असे सांगण्यात आले होते.

- Advertisement -

हे देखील वाचा Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका किती?

दरम्यान आज भाजपचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या सोशल मिडिया एक्सच्या अकौंट वर 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे .

मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे अजून पर्यंत जाहीर करण्यात आलेले नसून संभाव्य मंत्र्यांची नावे देखील कळणे बाकी आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...