Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMahayuti Press Conference : महायुतीचे 'रिपोर्ट कार्ड' प्रकाशित; कुठे केली गुंतवणूक,...

Mahayuti Press Conference : महायुतीचे ‘रिपोर्ट कार्ड’ प्रकाशित; कुठे केली गुंतवणूक, कोणती कामे केली?

मुंबई | Mumbai

काल (मंगळवार) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) बिगुल वाजले असून राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान (Voting) होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून आज महायुतीची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी महायुतीच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Mahayuti Press Conference : “… तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार”; महायुतीच्या नेत्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

रिपोर्ट कार्ड (Report Card) सादर करतांना महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी विरोधकांवर निशाणाही साधला. मात्र, सरकारने सादर केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये नेमकं काय आहे? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. महायुती सरकारने सादर केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये “लाडकी बहीण योजना, टोलमाफी, महिला, युवक, कामगार यांच्यासाठी आणलेल्या कल्याणकारी योजना राबवून महायुतीने सर्वसामान्य जनतेसाठी काय केले, याची आहे.तसेच मागील दोन ते अडीच वर्षांमध्ये सरकारने कुठे गुंतवणूक केली याचीही माहिती” या रिपोर्ट कार्डमध्ये आहे.

हे देखील वाचा : मुंबईतील लोखंडवाला येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “एका रिपोर्ट कार्डमध्ये बसणार नाही, एवढी कामे महायुती सरकारने केली आहेत. रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी हिंमत लागते, काम करावे लागते. आम्ही एवढी कामे केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाहीत. पायाभूत सुविधांमध्ये आज महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टर रोड सारखे प्रकल्प महायुती सरकारने पूर्ण केले. महायुती सरकारचे काम वाखाणण्याजोगी आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.

हे देखील वाचा : ५ वर्षात महाराष्ट्रातील सत्ताकारण कसे होते? ३ सरकारं, ३ मुख्यमंत्री, एक व्यक्ती तीनदा उपमुख्यमंत्री अन् बरचं काही…

तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्थगिती सरकार गेल्यानंतर प्रगतीचं सरकार राज्यात आले. सरकारच्या गतीमुळे राज्याची प्रगती लक्षात आली. परिवर्तन करणाऱ्या योजना आम्ही आणल्या. शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मविआने एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकिय मान्यता दिली नसल्याने सिंचनाचे काम ठप्प होते.त्यामुळे १४५ प्रकल्पांना आता मान्यता मिळाली असून, महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी भागात या प्रकल्पांच्या कामांची सुरुवात करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले, “आरोप-प्रत्यारोप करताना…”

तसेच अजित पवार म्हणाले की, “जनतेच्या जीवन बदलणाऱ्या योजना आम्ही दिल्या आहेत. आमच्या योजनांचा मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे ते गडबडून गेले आहेत. ज्यावेळी आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी होणार नाही, फॉर्म भरले जातील पैसे मिळणार नाही अशी टीका विरोधकांनी केली. मात्र अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये गेल्या पाच महिन्यांपासून पैसे जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या