जळगाव ।
जळगाव शहर महानगरपालिकेच्या 75 पैकी 63 जागांसाठी काल गुरुवारी मतदान झाले. यानंतर आज 16 जानेवारीला सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. 12 जागा अधिच बिनविरोध विजयी झालेल्या असलेल्याने उर्वरीत जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीत महायुती सुसाट दिसून आली. 75 जागांपैकी तब्बल 70 जागा जिकंत महायुतीने प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपने 47, शिवसेना शिंदे गटाने 23 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच ठिकाणी उमेदवार उभे केले होते. पैकी भाजपने 47 पैकी 46 जागांवर विजयी आघाडी घेतली असून शिवसेना शिंदे गटाला देखील 23 पैकी 22 जागांवर विजयी आघाडी मिळाली. तर अजित पवार गटाचा पाच पैकी एकच उमेदवार विजयी झाले आहेत.
तुरुंगातून जिंकली निवडणूक
शिवसेनेच्या तिकीटावर माजी महापौर ललित कोल्हे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. कोल्हे कुटुंबीयांपैकी तिघांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. ललित कोल्हे, पियुष कोल्हे आणि सिंधू कोल्हे विजयी झाल्या आहेत.
बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले माजी महापौर ललित कोल्हे कोठडीत आहे. दरम्यान, जळगाव कारागृहात पुरेशी जागा नसल्याच्या कारणावरून कोल्हे यांची थेट नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मनसे, भाजप आणि खान्देश विकास आघाडी अशा राजकीय प्रवासानंतर ललित कोल्हे शिंदेसेनेत स्थिरावले आहेत.
विरोधकांच्या वल्गना हवेतच
निवडणूक जाहीर झाल्यांनतर विरोधकांनी अनेक वल्गना केल्या.महायुतीला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याची गरज असताना मात्र शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी (शप) व काँग्रेस स्वबळावर मैदानात उतरले त्यामुळे व्हायचा तो पररिणाम झाला.या तिघांना खाते देखील उघडता आले नाही.
दिग्गजांचा विजय;सत्ताधार्यांची घौडदौड
महायुतीकडून अनेक दिग्गज मैदानात होते.त्यांचा विजय झाला आहे.यात माजी महापौर नितिन लढ्ढा,ललीत कोल्हे,सिंधताई कोल्हे,अरविंद देखमुख,निष्णू भंगाळे,चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.




