Tuesday, April 22, 2025
Homeमनोरंजनसाउथ सुपरस्टार महेश बाबूला ईडीने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?

साउथ सुपरस्टार महेश बाबूला ईडीने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?

दिल्ली । Delhi

साउथ सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबू याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) ने त्याला समन्स बजावले आहे. या प्रकरणात त्याची चौकशी होणार असून, त्याला 27 एप्रिल रोजी हैदराबादमधील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

ही कारवाई साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या रिअल इस्टेट कंपन्यांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणाशी जोडलेली आहे. महेश बाबू या कंपन्यांच्या ‘ग्रीन मेडोज’ प्रकल्पाचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. त्यामुळे त्याची भूमिका तपासण्यासाठी ईडीने समन्स जारी केले आहेत.

अलीकडेच ईडीने या दोन्ही कंपन्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित गुंतवणूकदारांवर छापेमारी केली होती. साई सूर्या डेव्हलपर्सचे मालक सतीश चंद्र गुप्ता यांच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रांची निर्मिती केल्याचे गंभीर आरोप आहेत. ईडीच्या तपासात हे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले.

मीडिया रिपोर्टनुसार, महेश बाबू यांना साई सूर्या डेव्हलपर्सच्या जाहिरातीसाठी एकूण 5.9 कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले होते. यामध्ये 3.4 कोटी रुपये बँकिंग व्यवहारातून, तर उर्वरित 2.5 कोटी रुपये रोख स्वरूपात देण्याचे ठरले होते. यातील रोख रकमेच्या व्यवहारांवर आता ईडी चौकशी करत आहे. सध्या महेश बाबूविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही, मात्र त्याला विचारणा होणार आहे. या चौकशीतून आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Akole : पिस्तूल रोखत दारू विक्रेत्या महिलेच्या बंगल्यावर दरोडा

0
अकोले |प्रतिनिधी| Akole अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड अकोले,वय 76) व त्यांच्या मुलीस सोफा व खुर्चीला दोरीने बांधून तोंडाला...