हिमाचल प्रदेश
आज रात्री हिमाचल प्रदेशातील बिलासपुर जिल्ह्यात एका बसवर डोंगराचा ढिगारा कोसळून मोठा अपघात झाला आहे. या घटनेत बसमधील पंधरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले असू मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. सध्या घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे पथकही पोहोचले असून जेसीबीच्या मदतीने माती हटवली जात आहे.
- Advertisement -
दरम्यान, झालेल्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.तसेच मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केला आहे. सुखू यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना केली आहे. या कठीण काळात राज्य सरकार पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेल असंही त्यांनी म्हटलं आहे.




