Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारधडगांव तालुक्यात वादळी वार्‍यामुळे घरांचे मोठे नुकसान

धडगांव तालुक्यात वादळी वार्‍यामुळे घरांचे मोठे नुकसान

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

धडगाव (Dhadgaon) तालुक्यात सोनबुद्रुक, सोन खुर्द, खडक्या, भानोली व छापरी या गावांना वादळी वार्‍याचा फटका (blow of the storm) बसला असुन घरांचे मोठे नुकसान (damage to houses) झाले आहे. तसेच घराची लाकडे बोलेरो व ट्रॅक्टरवर पडल्याने नुकसान झाले आहे.

- Advertisement -

नंदुरबार जिल्हाभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून शहादा, तळोदा, धडगाव, नवापूर, अक्कलकुवा, तालुक्यात मुसळधार पावसाने (torrential rain) हजेरी दिल्याने शेतकरी सुखावले (farmers were relieved) आहेत. मुसळधार पावसामुळे धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात नदी-नाल्यांना पूर आला आहे, तर वादळी वार्‍यामुळे अनेक घरांचे (damage to houses) व झाडांचे नुकसान झाले आहे.

शहादा शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. धडगाव तालुक्यातील सोनबुद्रुक, सोन खुर्द, खडक्या, भानोली व छापरी गावाला वादळी वार्‍याचा फटका बसला असुन गावात झालेल्या वादळी वार्‍यामुळे (blow of the storm) गावातील झाडे, अनेक घराची कौल आणि घरे पडून मोठे आर्थिक नुकसान (Financial loss) झाले आहे.

तर घराजवळ लावलेल्या ओजार्‍या पावरा यांच्या ट्रॅक्टरवर व काळुसिंग पावरा यांच्या बोलेरो वाहनावर घराची लाकडे आणि कौल पडून वाहनांचे नुकसान झाले गावात मोठ-मोठी आंब्याची झाडे, फांद्या, महुची झाडे उन्मळून पडली आहे. छापरी गावांतील आबला पावरा यांचे पूर्ण घर पडून संसार उघड्यावर पडला आहे. प्रशासकीय पातळीवरून या सर्व नुकसानीचा पंचनामा (Panchnama) करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकरी करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या