Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनयंदा Oscars 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार मल्याळम सिनेमा '2018- Everyone is...

यंदा Oscars 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार मल्याळम सिनेमा ‘2018- Everyone is a Hero’

मुंबई | Mumbai

2018 Everyone is a Hero या मल्याळम चित्रपटाची ऑस्कर 2024 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. Film Federation of India कडून याची घोषणा नुकतीच करण्यात आली.

- Advertisement -

ज्युड अँथनी जोसेफ यांचा हा सिनेमा असून केरळ राज्याला उद्ध्वस्त करणाऱ्या ऑगस्ट 2018 च्या दुर्दैवी महापुरावर आधारित आहे. केरळ राज्यातील या पुरात 14 जिल्हे बाधित झाले होते, 500 हून अधिक लोक मरण पावले आणि 15 लोक बेपत्ता झाले होते. हा चित्रपट सामान्य नागरिकांनी दाखवलेल्या विलक्षण धैर्य आणि एकतेवर बेतला आहे.

केवळ 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 2018 या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली होती. 5 मे रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सुरवातीला मल्याळम आणि नंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये हा सिनेमा रीलीज करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या