Friday, May 31, 2024
Homeनाशिकपुरुष प्रधान संस्कृती जबाबदार

पुरुष प्रधान संस्कृती जबाबदार

अ‍ॅ‍ॅड मिलिंद बाबर

कौटुंबिक हिंसाचाराला आपली पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे. ज्या घरात पुरुषत्वाची जाणीव करून दिली जाते किंवा पुरुष सांगेल तसेच घरात घडायला हवे असे होत असते त्याठिकाणीदेखील कौटुंबिक हिंसाचार होत असतो. याची पोलीस ठाण्यात नोंद नसली तरी बर्‍याच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात हे बघायला मिळते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे वडीलधार्‍यांचा घरावर अंकुश असल्याने कौटुंबिक हिंसाचार हा शब्ददेखील समोर येत नव्हता.

- Advertisement -

मात्र काळाच्या बदलानुसार ती पद्धती बदलली व कौटुंबिक हिंसाचाराला सुरुवात झाली. कोविडकाळात पती- पत्नी हे घरातच असल्याने याचे प्रमाण वाढले होते. कारण इतर नातेवाईकांशी संवाददेखील कमी झाला होता. देशात कौटुंबिक हिंसाचारामध्ये दिल्ली व हरियाणाचा प्रथम क्रमांक लागतो तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी आहे, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे.

काही घरांमध्ये मुलीला लहानपणापासूनच दुय्यम दर्जा दिल्याने तिचे लग्न झाल्यावर तिची मानसिकतासुद्धा दुय्यम स्थानाची होत असल्यानेदेखील कौटुंबिक हिंसाचार होतो. काही घरांत पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांना मोकळीक दिली जात नसल्याने ती महिला बाहेर कुणाशी बोलली तरी संशयामुळे कौटुंबिक हिंसाचार घडत असतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

काही ठिकाणी पती व्यसनाधीनतेमुळे पत्नीकडून पैशांची मागणी करत असतात. त्यामुळे वाद होऊन त्या महिलेला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावे लागते. काही घरांत पती व्यसनाधीनतेमुळे आपल्या कामाच्या ठिकाणी सुट्ट्या घेतात. त्याचा परिणाम त्यांच्या पगारावर झाल्यानंतर पत्नीला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले जाते. त्याठिकाणीदेखील कौटुंबिक हिंसाचार होतो. काही ठिकाणी लोकांची मानसिकता अद्यापही बदलली नसल्याने हुंड्याची प्रथा अद्यापही चोरीछुप्या किंवा वेगळ्या स्वरूपात सुरू आहे. त्यामध्ये काही कमतरता राहिल्यास पत्नीचा छळ करणे किंवा तिला मारहाण करण्याचे प्रकार घडतात.

शब्दांकन : निशिकांत पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या