पुणे | प्रतिनिधी Pune
- Advertisement -
राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २२ जून रोजी झाली होती या निवडणुकीची मत मोजणी ३५ तास चालली होती. आता या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे.
यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व कायम राहिलं आहे. तर विरोधी गटाकडून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत.अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला 21 पैकी 20 जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवार गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार पराजित झाले.




