Friday, May 3, 2024
Homeनाशिकमालेगाव : कोई आ नहीं सकता, कोई बाहर जा नहीं सकता; बंदोबस्त...

मालेगाव : कोई आ नहीं सकता, कोई बाहर जा नहीं सकता; बंदोबस्त वाढवला

मालेगाव | प्रतिनिधी

आजपासून (दि. १५) मालेगावमध्ये ३० एप्रिलपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मालेगावमधील हॉटस्पॉटची पाहणी रात्री उशीरापर्यंत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंग यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी केली.  परिसरात कुठलेही नागरिक रस्त्यावर दिसणार नाहीत याची दखल पोलीस घेणार आहेत. शहरातील पेट्रोल पंप बंद राहतील, केवळ तीन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेसाठी सुरु ठेवण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश घटना व्यवस्थापक डॉ पंकज आशिया यांनी काढल्यानंतर पोलीस दलाने कुमक वाढविली आहे.

- Advertisement -

मालेगावमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असले तरी मेडिकल आणि हॉस्पिटलला यातून सुटका आली आहे. याठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  दुसरीकडे उद्यापासून पुढील चार दिवस मालेगाव शहरातील बँकाही बंद असणार आहेत. बॅंकेबाबत निर्णय चार दिवसानंतर घेतला जाईल असेही डॉ. आशिया यांनी सांगितले आहे.

मालेगाव शहरातील संपूर्ण रस्ते सील करण्यात आले आहेत. कोन्हीही मालेगावात येऊ शकणार नाही अथवा मालेगावमधून बाहेर पडू शकणार नाही अशी व्यवस्था पोलिसांनी केली आहे. मालेगावमधील रस्त्यांवर तसेच अडचणीच्या रस्त्यांवर गर्दी जमू नये यासाठी ड्रोनचीदेखील मदत घेऊन पोलीस लक्ष ठेवणार आहेत.

असे आहेत आदेश

१. मेडीकल्स, हॉस्पीटल सुरु राहतील

२. दुध व चारा पुरवठा करणारे विक्रेते जाऊ येऊ शकतात

३. गॅस पुरवठा करणान्या गॅस एजन्सीज सुरु राहतील

४. (१) पोलिस दक्षता पेट्रोलपंप, रावळगांव नाका, मालेगाव कॅम्प. (२) मुतल्लिक पेट्रोलपंप, दरेगांव (३) उदयराज ऑटोमोबाईल, पेट्रोलपंप, मालेगाव कॅम्प (केवळ पोलिस विभाग, महसुल विभाग, म.न.पा. मालेगाव, M.S.E.B. विभाग, आरोग्य विभाग यातील अधिकारी/कर्मचारी तसेच खाजगी डॉक्टर व त्यांच्या आस्थापनेवरील स्टाफ यांना पेट्रोल/डिझेल पुरवठा करणेकामी.) वर नमुद ३ पेट्रोलपंप सकाळी ११.०० वाजेपासुन ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत पेट्रोल मिळेल.

५. मालेगाव शहर व हद्दीपासुन २ किलोमीटर परिघातील इतर सर्व पेट्रोलपंप बंद राहतील.

६. स्वस्त धान्य दुकाने व शासकीय धान्य गोदामापासुन स्वस्त धान्य दुकानापर्यंत वाहतुक करणारे वाहने व त्यासाठीचे मनुष्यबळ परवानगी राहील.

७. उपविभागीय दंडाधिकारी, मालेगाव यांच्या परवानगीने अन्नदान करणाऱ्या व्यक्ती अथवा स्वयसेवी संस्था (NGOs) यांना परवानगी.

८. केवळ हातगाडीवरुन भाज्या विक्रीकरणारे विक्रेते व किराणा दुकाने यांना सकाळी ०७.०० वाजेपासुन ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत या कालावधीकरीता सुट राहील.

९. मालेगाव शहर हद्दीतील सर्व बँका दि. १५.०४.२०२० ते १९.०४.२०२० पर्यंत बंद राहतील. तद्नंतर केवळ बँकाबाबत स्वतंत्र आदेश काढला जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या