बारामती | Baramati
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Factory Election) मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. काल (मंगळवारी) सकाळी ९ वाजता सुरु असलेली मतमोजणी आजही (बुधवार) सुरु आहे. मतमोजणीला २२ पेक्षा जास्त तास झाले असून, आतापर्यंत तीन निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले आणि इतर मागासवर्ग गटातून नितीन शेंडे विजयी झाले आहेत.
मतमोजणीची (Vote Counting) पहिल्या फेरी पूर्ण झाली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निळकंठेश्वर पॅनलचे १७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत. आतापर्यंत आलेल्या निकालात अजित पवार यांची एकमेव विजयी (Won) उमेदवार (Candidate) म्हणून घोषणा करण्यात आली आहे. तर अद्याप वीस उमेदवारांचा निकाल हाती येणे बाकी आहे.
दरम्यान, सहकार बचाव सांगवी गटातून पॅनलचे चंद्रराव तावरे, रणजित खलाटे, महिला गटातून राजश्री कोकरे तर बारामती गटातून नेताजी गवारे हे आघाडीवर आहेत. तर मोजणीला विलंब झाल्याने दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे साडेपाच वाजता सुरू झाली आहे. यामुळे निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे.
पहिल्या फेरीअखेर मिळालेली एकूण मते
अनुसूचित जाती-जमाती
बापूराव आप्पाजी गायकवाड -3717 (तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल) पराभूत
रतनकुमार साहेबराव भोसले – 4117 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल ) विजयी
इतर मागासवर्ग
रामचंद्र कोंडीबा नाळे – 7341 (तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल) पराभूत
नितीन वामनराव शेंडे 8494 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल ) विजयी
भटक्या विमुक्त जाती
विलास ऋषिकांत देवकाते 4269 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल ) आघाडी
सूर्याजी तात्यासो देवकाते 3288 (तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल ) पिछाडी
महिला राखीव मतदारसंघ
राजश्री बापूराव कोकरे – 3835 (तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल ) आघाडी
संगीता बाळासाहेब कोकरे – 4021 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल ) आघाडी
ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले – 3568 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल) पिछाडी
ब वर्ग
अजित पवार – 91 विजयी
भालचंद्र देवकाते – 10
माळेगाव ऊस उत्पादक गट क्रमांक -1
रणजीत जाधवराव – 4332 (अजित पवार गट) – आघाडी
बाळासाहेब तावरे 3803 (अजित पवार गट) – आघाडी
राजेंद्र बुरुंगले – 3760 (अजित पवार गट)- आघाडी
संग्राम काटे – 3425 (तावरे गट)- पिछाडी
रमेश गोफने – 2963 (तावरे गट) – पिछाडी
रंजनकाका – 3587 (तावरे गट) – पिछाडी
पणदरे गट क्रमांक – 2
तानाजी कोकरे – 3808 (अजित पवार गट) – आघाडी
योगेश जगताप – 4110 (अजित पवार गट) – आघाडी
स्वप्नील जगताप -3796 (अजित पवार गट) – आघाडी
रोहन कोकरे – 3314 (तावरे गट) – पिछाडी
रणजित जगताप – 3050 (तावरे गट) – पिछाडी
सत्यजित जगताप – 3247 (तावरे गट) – पिछाडी
सांगवी गट क्रमांक – 3
चंद्रराव तावरे – 4041(तावरे गट) – आघाडी
गणपत खलाटे – 4115 (अजित पवार गट)- आघाडी
रणजित खलाटे – 3747 (तावरे गट)- आघाडी
विजय तावरे – 3645 (अजित पवार गट)- पिछाडी
विरेंद्र तावरे – 3332 (अजित पवार गट) – पिछाडी
खांडज शिरवली गट क्रमांक – 4
प्रताप आटोळे – 3995 (अजित पवार गट) – आघाडी
सतीश फाळके – 4117 (अजित पवार गट)- आघाडी
विलास सस्ते – 3258 (तावरे गट) – पिछाडी
पोंदकुले मेघश्याम – 3145 (तावरे गट) – पिछाडी
निरावागज गट क्रमांक – 5
अविनाश देवकाते – 4289 (अजित पवार गट) – आघाडी
जयपाल देवकाते – 3862 (अजित पवार गट) – आघाडी
केशव देवकाते – 3179 (तावरे गट) – पिछाडी
राजेश देवकाते – 3254 (तावरे गट) – पिछाडी
बारामती गट क्रमांक – 6
नितीन सातव – 3559 (अजित पवार गट) – पिछाडी
नेताजी गवारे – 3740 (तावरे गट) – आघाडी
देविदास गावडे – 3898 (अजित पवार गट) – आघाडी
गुलाबराव गावडे – 3542 (तावरे गट) – पिछाडी




