Saturday, February 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMalegaon Mayor Election: मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालीद हाजी...

Malegaon Mayor Election: मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालीद हाजी तर उपमहापौरपदी सपा च्या शान-ए-हिंद विजयी

मालेगाव | प्रतिनिधी
मालेगावमध्ये पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे मालेगावच्या महापौरपदी शेख नसरीन बानो या विराजमान झाल्या आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार लता घोडके यांचा २५ मतांच्या फरकाने पराभव केला. तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद या विजयी झाल्या आहे.

आज मालेगाव महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेला जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. यावेळी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव हेही उपस्थित होते. सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाले, तसेच दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

- Advertisement -

या निवडणुकीत भाजप आणि एमआयएम (MIM) या दोन्ही पक्षांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. ज्याचा फटका शिंदे गटाला बसल्याचे सांगण्यात येत आहे. ८४ सदस्यसंख्या असलेल्या मालेगाव महापालिकेत महापौर पदासाठी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो आणि शिवसेना शिंदे गटाच्या लता घोडके यांच्यात थेट लढत झाली. यात शेख नसरीन बानो यांना एकूण ४३ मते मिळाली. तर लता घोडके यांना केवळ १८ मते मिळाली. त्यांचा २५ मतांनी पराभव झाला. नसरीन बानो यांना इस्लाम पार्टीच्या 35, समाजवादी पार्टीच्या 5 आणि काँग्रेसच्या 3 अशा एकूण 43 नगरसेवकांनी मतदान केले.

YouTube video player

BMC Mayor: मुंबईच्या महापौर उपमहापौरपदासाठी भाजप-शिवसेना शिंदे गटाकडून ‘यां’ची घोषणा

महापौर पदासाठी एकूण तीन उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. मात्र, प्रत्यक्ष लढत ही शेख नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यातच पाहायला मिळाली. विजयाची अधिकृत घोषणा होताच महापालिका सभागृहात सेक्युलर फ्रंटच्या नगरसेवकांनी गुलालाची उधळण करत आणि घोषणाबाजी करत मोठा जल्लोष केला.

उपमहापौरपदावर समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांनी दणदणीत विजय
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरपदावर समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. झालेल्या थेट लढतीत शान-ए-हिंद यांना 43 मते मिळाली, तर शिवसेनेचे ॲड. निलेश काकडे यांना 18 मतांवर समाधान मानावे लागले. उपमहापौरपदासाठी एकूण आठ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. तपासणीनंतर समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद, एमआयएमचे हाफिज अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, शिवसेनेचे नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, निलेश काकडे तसेच समाजवादीचे मोहम्मद मुश्तकिन मोहम्मद मुस्तफा यांचे अर्ज वैध ठरले. माघारीच्या प्रक्रियेत एमआयएमचे हाफिज अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, समाजवादीचे मोहम्मद मुश्तकिन मोहम्मद मुस्तफा आणि शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने शान-ए-हिंद आणि शिवसेनेचे ॲड. निलेश काकडे यांच्यात सरळ लढत झाली. इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने शान-ए-हिंद यांनी उपमहापौरपदावर बाजी मारली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar Drug Trafficking : नगर जिल्हा ‘ड्रग्ज’च्या विळख्यात

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात ड्रग्ज व इतर अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे युवक वर्ग नशेच्या आहारी जात असल्याची गंभीर बाब...