Friday, May 3, 2024
Homeनाशिकमालेगाव : अंत्ययात्रेस पाच पेक्षा अधिक जण उपस्थित राहिल्यास होणार कारवाई; पुकारा...

मालेगाव : अंत्ययात्रेस पाच पेक्षा अधिक जण उपस्थित राहिल्यास होणार कारवाई; पुकारा बंद

मालेगाव मनपा प्रशासन व धर्मगुरूंच्या बैठकीत इशारा

मालेगाव | प्रतिनिधी

करोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाल्यास दफनविधी अथवा अंत्ययात्रेत पाच व्यक्तींनी च सहभागी व्हावे जास्त लोक सहभागी झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई प्रशासनास करावी लागेल असा इशारा मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिला आहे.

- Advertisement -

शहरात अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असल्याने करुणा विषणू चा पादुर्भाव फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर आज मनपात विविध पंथांच्या धर्मगुरू व मुलग्यांची बैठक घेण्यात आली यावेळी करोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर मंथन करण्यात आले. आयुक्त बोर्डे यांच्यासह महापौर ताहेरा शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, स्थायी समिती सभापती डॉ खालिद परवेज यांच्यासह धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शहरात करोना विषाणू थैमान घालत असताना अंत्यविधी व व अंत्ययात्रेत होत असलेल्या गर्दी बद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. आरोग्य मंत्रालयाने विषाणू बाधित मृतदेह हाताळण्यास त्याची लागण इतरांना होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अंत्यविधी अथवा अंत्ययात्रेत पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी सहभागी होऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याकडे लक्ष वेधत आयुक्त बोर्डे यांनी धर्मगुरूंनी यासंदर्भात शहरात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

पुकारा करण्यास बंदी

अंत्यविधीस जास्त गर्दी होऊ नये यास्तव शहरात मयतीचा पुकारा करण्यास मनपा प्रशासनाने बंदी घातली आहे. यापुढे पुकारा केल्यास सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली नाही. करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेह रुग्णालयातून थेट रुग्णवाहिकेतून कबरस्तान अथवा स्मशानभूमीत घेऊन जावे अंतयात्रा खांद्यावरून काढता येणार नाही अशी सूचना यावेळी करण्यात आली. कबरस्तानात पाच पेक्षा जास्त लोकांना प्रवेश देऊ नये अन्यथा कारवाई केली जाईल असे पत्र संबंधितांना देण्यात आले आहे. धर्मगुरूंनी पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त बोर्डे, उपायुक्त कापडणीस व दोरकुळकर यांनी केले. विषाणूचे थैमान रोखण्यासाठी जनतेने घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान महापौर ताहेरा शेख यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या