Sunday, February 1, 2026
HomeनाशिकMalegaon Politics : मालेगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी 'यांची' नावे निश्चित; उद्या...

Malegaon Politics : मालेगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी ‘यांची’ नावे निश्चित; उद्या अर्ज दाखल करणार

भाजप नगरसेवक 'तटस्थ' राहण्याची चर्चा

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

इस्लाम-समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंटतर्फे महापौर पदासाठी इस्लाम पार्टीच्या (Islam Party) नसरीनबानो शेख खालीद हाजी तर उपमहापौर पदासाठी (Mayor and Deputy Mayor Post) समाजवादीच्या शानेहिंद निहाल अहमद यांचे नाव निश्चित झाल्याने या दोघांनी आज महापौर-उपमहापौर पदाचे नामांकन अर्ज घेतले. सोमवार (दि. २ फेब्रुवारीस) नसरीनबानो व शानेहिंद आपले नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. हे दरम्यान, काँग्रेस-भाजपच्या पाच नगरसेवकांनी भारतीय विकास आघाडी असा गट स्थापन केला आहे.

- Advertisement -

भाजप नगरसेवकांनी (BJP Corporators) मतदान केल्यास जातीयवादी पक्षास सोबत घेतल्याचा आरोप इस्लाम पार्टीका एमआयएमतर्फे होवू शकणार असल्याने भाजपचे दोघे नगरसेवक सभागृहात ‘तटस्थ’ राहणार असल्याच्या चर्चेला येथे उधाण आले आहे. मदतीने (Voting) महानगरपालिकेत महापौर पदासह सत्ता संपादन करण्यासाठी इस्लाम-समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंटने काँग्रेसच्या तिघा नगरसेवकांच्या बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४३ चे संख्याबळ गाठले आहे. यामुळे इस्लाम पार्टीचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

YouTube video player

इस्लामचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांचे बंधू खालीद हाजी यांच्या पत्नी नसरीनबानो यांचे नाव अपेक्षेनुसार महापौर पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. याबरोबरच समाजवादी पार्टीच्या महानगरप्रमुख शानेहिंद निहाल अहमद यांचे नाव उपमहापौर पदासाठी निश्चित झाले आहे. नसरीनबानी व शानेहिंद या दोघांनी आज नगरसचिवांकडून महापौर उपमहापौर उमेदवारीचे अर्ज घेतले. सोमवारी हे नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले जाणार आहे. महापौर पदासाठी नसरीनबानो तर उपमहापौर पदासाठी शानेहिंद यांचे नाव निश्चित झाल्याने सेक्युलर फ्रंटच्या पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

महापौर पदासाठी नाव निश्चित झालेल्या नसरीनबानो यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. विशेष म्हणजे इस्लामचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांचे बंधू खालीद हाजी यांच्या त्या पत्नी आहेत. २०१७ मध्ये नसरीनबानो महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने त्यांचे महापौरपद हुकले होते. मात्र नशीबाने साथ देत त्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या, त्यामुळे त्यांचे महापौर होण्याचे स्वप्न देखील साकार होणार आहे.

उपमहापौर पदासाठी माजीमंत्री स्व. निहाल अहमद यांच्या कन्या शानेहिंद निहाल अहमद यांचे नाव निश्चित झाले आहे. एलएलबीसह एमचीएची पदवी घेणाऱ्या शानेहिंद उच्चशिक्षित असून महानगरपालिकेत त्या तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. यापुर्वी विरोधी पक्षनेता, गटनेता आदी पदे शानेहिंद यांनी भुषविली असल्याने सभागृहाचे कामकाज कसे हाताळायचे याचा दांडगा अनुभव त्यांना असल्यामुळेच उपमहापौरपदासाठी त्यांच्या नावास पसंती देण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

महापौर-उपमहापौर पदासाठी येत्या ७ फेब्रुवारी शनिवारी सकाळी ११ वाजता मनपा सभागृहात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ३ फेब्रुवारी दुपारी २ वाजेपर्यंतच नामांकन अर्ज दाखल करता येणार असल्याने सोमवारी २ फेब्रुवारीस सेक्युलर फ्रंटतर्फे निश्चित झालेल्या महापौर-उपमहापौराचे नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहेत.

इस्लाम-समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंटला काँग्रेसच्या तिघा नगरसेवकांचे समर्थन लाभल्याने बहुमताचे संख्याबळ पुर्ण करता आले आहे. यामुळे काँग्रेसला प्रथम वर्षीच स्थायी समिती सभापतीपद दिले जाणार आहे. काँग्रेसचे तीन नगरसेवक असले तरी भाजपबरोबर गट स्थापन केल्याने हे संख्याबळ पाच झाले आहे. त्यामुळे इस्लाम पार्टीचे पाच नगरसेवकांच्या मदतीने काँग्रेसचा एक सदस्य स्थायी समितीत जावू शकणार आहे. पाठींब्यासाठी झालेल्या तडजोडीत हे निश्चित झाले असल्याचे सांगितले जाते.

काँग्रेस (Congress) महानगरप्रमुख नगरसेवक एजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मीन बेग या देखील विजयी झाल्या आहेत. एजाज बेग यांनी यापुर्वी स्थायी समितीचे सभापतीपद भुषविले आहे. महापौर-उपमहापौरपदी महिला विराजमान होणार असल्याने स्थायी समिती सभापती पदासाठी ते पत्नी यास्मीन बेग यांना संधी देण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने असे झाल्यास महानगरपालिकेवर ‘महिला राज’ येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेना-एमआयएमच्या मौनाने गुढ वाढले

शहराच्या विकासासाठी विनाशर्त पाठींब्याचे आवाहन इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांनी एमआयएमसह शिवसेनेस केले होते. या संदर्भात इस्लाम-समाजवादी सेक्युलर फ्रंटच्या पदाधिकाऱ्यांसोबत एमआयएम व शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली होती. शिवसेनेने महापौर पदाची केलेली मागणी इस्लामने नाकारली होती व या व्यतिरिक्त प्रस्ताव देण्याची सुचना केली होती. एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांनी जातीयवाद्यांना रोखण्यासाठी सेक्युलर फ्रंटला पाठींबा देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र विकासाचा आराखडा दाखवत या संदर्भात बोलणी करावी, अशी अपेक्षा एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती यांनी व्यक्त केली होती. परंतू अशी चर्चा इस्लामने अद्याप केली नसल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना व एमआयएमतर्फे पाठींब्यासंदर्भात मौन बाळगल्याने गुढ वाढले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : मैत्रिणीनेच मारला अडीच लाखांवर डल्ला

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road बँकेत (Bank) भरण्यासाठी घरात ठेवलेली २ लाख ४० हजार रुपयांची रोकड मैत्रिणीनेच (Friend) आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरून नेल्याची घटना...