Saturday, July 11, 2026
Homeक्राईमNashik Crime News : उसनवारी दिलेल्या तीस लाखांसाठी पेटवून घेत आत्महत्या; RTO...

Nashik Crime News : उसनवारी दिलेल्या तीस लाखांसाठी पेटवून घेत आत्महत्या; RTO एजंटने आप्तेष्टाच्या घरासमोरच संपवले जीवन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उसने दिलेले तीस लाख रुपये परत करावेत, यासाठी आरटीओ एजंटने संबंधित व्यक्तिच्या घरासमोर (House) अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत जीवन संपविले. आडगाव हद्दीतील (Aadgaon Area) धात्रक फाटा येथे ही खळबळजनक घटना घडली असून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेमंत बिपीनकुमार भाटे (वय ४०, रा. मालपाणी टॉवर, पाथर्डी फाटा) असे मृत व्यक्तिचे (Person) नाव आहे. आता आडगाव पोलीस पुराव्यांनुसार, तपास करत असून संशयित व्यक्तिवर आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

आडगाव पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, हेमंत भाटे हे आरटीओ चे कार्यालयीन कामकाजासंदर्भात नागरिकांना सहकार्य करणारे व्यक्ति असल्याचे समजते. बुधवारी (दि. २८) ते सायंकाळी धात्रक फाटा परिसरात होते. मगधराज सोसायटीजवळ त्यांनी स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. नागरिकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारार्थ नेण्यात आले.

मात्र, शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी उशिराने त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. आडगाव पोलीस तपास सहायक निरीक्षक निखील बोंडे करत आहेत. आडगाव पोलिसांनी पंचनामा केला असून आर्थिक व्यवहार, फोन कॉल्स, संदेश व अन्य पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणात संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ जुलै २०२६ : ई-२० चा गदारोळ अन् संभ्रमाचे...

0
देशभरात इथेनॉलमिश्रित ई-२० पेट्रोलच्या वापरावरून सध्या उठलेले वादंग केवळ तांत्रिक स्वरुपाचे नसून थेट सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाशी आणि विश्वासाशी जोडलेले आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलाची...