Sunday, May 5, 2024
Homeनगरमाळेवाडी येथील महिला दारुबंदीसाठी आक्रमक

माळेवाडी येथील महिला दारुबंदीसाठी आक्रमक

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी येथे अनधिकृतपणे सुरु असलेल्या देशी-विदेशी दारुची दुकाने त्वरीत बंद करावीत, अशी मागणी महिलांसह ग्रामस्थांनी केली असून महिलांनी श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयाबाहेर दारूबंदी झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करत नगर येथील पोलीस अधीक्षक तसेच दारू उत्पादन शुल्क अधिकारी यांना निवेदन दिले.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक विद्यालय परिसराजवळ अनेक ठिकाणी अवैध दारू व्यवसाय जोमात सुरू आहेत. ठिकठिकाणी दारूचे व्यवसाय सुरू झाल्याने अनेक तरुण व्यसनाधिन होत आहेत. अनेकांचे कुटुंब दारुच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झाले असून मजूर काम करणारे आपल्या कुटुंबासाठी खर्च न करता दारुसाठी पैसे खर्च करत असल्याने त्या कुटुंबियांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. दारुच्या व्यसनापायी अनेक तरुण घरी त्रास देत असून इतर अवैध व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भविष्यातील ही तरुण पिढी व्यसनाधिन होण्यापूर्वीच दारुविक्री करणार्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे.

या निवेदनावर सरपंच सोपानराव औताडे, रामभाऊ औताडे, रामभाऊ वमने, चेअरमन भरत वमने, कचरू औताडे, ग्रा. पं. सदस्य मारुती मोहन, संभाजी गायकवाड, चंद्रशेखर वमने, संचालक दिलीप औताडे, सुरेश ढोबळे, बबन औताडे, नानासाहेब औताडे, गौतम मोहन, बाळासाहेब ढोबळे, शिवाजी तारडे, विष्णूपंत नेद्रे, रघुनाथ नेद्रे, आयुबभाई शेख, शौकत सय्यद, आदींसह पोलीस पाटील उज्वला संजय जाधव, उपसरपंच दिपाली साईनाथ ढोबळे, माजी उपसरपंच अश्विनी सुशीलकुमार वमने, श्रीरंग जाधव, भाऊसाहेब औताडे, मदन हाडके, माजी उपसरपंच अनिता देविदास वाघ, ग्रा. पं. सदस्या कांताबाई दिगंबर उमाप, शिलाबाई मंजाबापू नेद्रे, जयश्री दिलीप औताडे, मालती मोहन, संगीता थोरात, मंदाताई नेद्रे, ज्योती वमने, नंदाताई वमने, लताबाई झुराळे, अनिता औताडे, देवकाबाई बर्डे, शकुंतला ढोबळे, बेबीताई जाधव, शारदा काळे, छाया औताडे, मुमताज सय्यद, विमल वमने, विठाबाई गायकवाड, बबिता सोनवणे, कल्पना औताडे, मंगल नेद्रे, माया मोरे, वंदना मोदी, आशाबाई पवार, सुनीता मेटे, रुपाली औताडे, वच्छलाबाई उमाप, मंदाबाई उमाप, आशाबाई गोरे, सविता वैरागळ आदी महिलांसह शेकडो ग्रामस्थांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या