Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! माओवादी संघटनेला मोठा धक्का; मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपतीची ६० सहकाऱ्यांसह...

मोठी बातमी! माओवादी संघटनेला मोठा धक्का; मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपतीची ६० सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर शरणागती

गडचिरोली | Gadchiroli
माओवादी चळवळीच्या इतिहासातील सगळ्यात मोठी धक्कादायक आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणेला दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. माओवाद्यांच्या संघटनेत सर्वोच्च असलेला ४० दशके माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा त्यांचा बौद्धिक चेहरा अशी ओळख असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने सुरक्षा यंत्रणांसमोर शस्त्र टाकले आहेत. त्याच्यावर विविध राज्यात मिळून दहा कोटीहून अधिक बक्षीस होते. १६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो शस्त्र खाली ठेवणार असल्याची माहिती समजत आहे.

भूपती हा नक्षलवादी संघटनेचा प्रभावशाली रणनीतिकार मानला जातो. तो अनेक वर्षे महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आणि संघटनेच्या शीर्ष नेतृत्वात मतभेद वाढले होते. भूपतीने ‘सशस्त्र संघर्ष ’ निष्फळ ठरल्याचे मान्य करून शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले होते. जनाधार घटला, शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे संघर्ष नव्हे तर संवादच पर्याय आहे, असे त्याने एका पत्रकात म्हटले होते.

- Advertisement -

नक्षली नेता भूपती याने ६० माओवाद्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर रात्री उशिरा आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. १९७० च्या दशकात माओवादी संघटना पीपल्स वर ग्रुप मध्ये प्रवेश करणारा वेणूगोपाल उर्फ भूपती याची कारकीर्द गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातून सुरू झाली. मोठा माओवादी नेता मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी याचा भूपती हा लहान भाऊ आहे.

YouTube video player

भूपती हा माजी महासचिव बसवराजू यांच्या मृत्यूनंतर तो पक्षाच्या सर्वोच्च पदाचा एक संभाव्य दावेदार मानला जात होता. त्याचा धाकटा बंधू किशनजी (मल्लोजुला कोटेश्वर राव) २०११ मध्ये कोलकात्याजवळ झालेल्या चकमकीत मारला गेला होता. भुपतीची पत्नी तारक्का हिने गेल्या वर्षीच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. ती सध्या पोलीस पुनर्वसन शिबिरात राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच भुपतीने केंद्र सरकारला शांतता वार्ताच्या चर्चेसाठी तसेच तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी पत्र लिहिले होते.

त्याच्या या भूमिकेला काही नक्षल नेत्यांनी विरोध केला आहे. त्यांनी संघटनेचा महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी याच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती. मात्र, केंद्रीय समितीने भूपतीवर दबाव आणून शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर त्याने संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आणि अखेर आपल्या साठ सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. गडचिरोली पोलिसांचा हे मोठे यश असून भूपतीला आत्मसमर्पण घडवण्यामध्ये काही दिवसापासून पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.. त्यात त्यांना यश आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस निरीक्षक शिळीमकर व उपायुक्त कराड यांना ‘राष्ट्रपती पदक’

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या...