Tuesday, May 21, 2024
Homeनगरमाळवाडगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका सुरू

माळवाडगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका सुरू

माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgav

सप्टेंबर अखेरीस पावसाने उघडीप दिली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पितृपक्षात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतच्या निवडणुकांची दि. 5 नोव्हेबर तारीख जाहीर केली. सप्टेंबर अखेरपर्यंत पडलेल्या पावसाने ऑक्टोबर उजाडताच पाठ फिरवली. कडक उन्हामुळे खरिपातील सोयाबीन जसजशी तापू लागली. तसतसे माळवाडगाव ग्रामपंचायत निवडणूक वातावरणही तापू लागले असून बैठक सत्र सुरू झाले आहे.

- Advertisement -

माळवाडगाव ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडीचे विखे पाटील समर्थक लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे व श्रीरामपूर बाजार समिती संचालक गिरीधर आसने यांच्या हातात पाच वर्ष एकहाती सत्ता होती. दि. 5 नोव्हेबर रोजी होणार्‍या निवडणुकीत सरपंच पदाचे आरक्षण आदिवासी पुरूष राखीव झाले असले तरी सत्ताधारी गट जोरात असून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी निवडणूक पूर्व तयारी सुरू केली आहे. मागील पंचवार्षिकचा अपवाद सोडला तर त्याअगोदर पंचवीस वर्षे डॉ. नितीन आसने यांचीही एक हाती सत्ता होती. पाच वर्ष सत्तेबाहेर असलेल्या डॉ. आसने यांच्या गटानेही जय्यत तयारी सुरू केली आहे.

या दोन्ही पारंपरिक विरोधी गटातच समोरासमोर लढत होणार आहे. उमेदवार चाचपणी, रूसवे फुगवे काढण्याचे काम सुरू झाले आहे. दोन्ही गटाच्या पहिल्या बैठकीची फेरी पूर्ण झाली आहे. सत्ताधारी गट आपण पाच वर्षांत विविध विकासात्मक कामासह जनजीवन मिशन योजनेचे भांडवल करणार आहे. तर डॉ. नितीन आसने यांनी पंचवीस वर्षांत गावचा सर्वांगिण विकास करत चेहरामोहरा बदलला असल्याचा दावा मतदारांसमोर करणार आहे.

एकूण 4 प्रभाग असून प्रभाग 1 मध्ये दोन जागा तर उर्वरित 2,3,4 प्रभागात प्रत्येक 3 जागा अशा एकूण 11 जागा असून लोकनियुक्त सरपंच हे 12 वे सदस्य असतील. द. 16 ते 20 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून दि. 23 ला छाननी तर दि. 25 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारीची अखेरची तारीख आहे. खरिप पीक काढणीसह अन्य शेती उद्योग आठवडा भरात आटोक्यात आणण्याची लगबग शेतकरी कार्यकर्ते, संभाव्य उमेदवार करत आहेत.

पुरुषांपेक्षा 4 महिला मतदार जास्त

प्रभाग 1- पुरुष 214, महिला 221 एकुण 435. प्रभाग 2- पुरूष 458, महिला 446 एकुण 904. प्रभाग 3 – पुरूष 285, महिला 293 एकुण 578. प्रभाग 4 – पुरूष 323, महिला 324 एकूण 647 असे एकूण 2564 मतदारापैकी 1280 पुरूष तर 1284 महिला मतदार आहे. पन्नास टक्क्यांची सरासरी ओलांडून चार महिला मतदार जास्त असून एकूण 12 सदस्यांत महिला सरपंचासह 6 महिला उमेदवार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या