Tuesday, May 5, 2026
Homeदेश विदेशWest Bengal Legislative Election 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी; टीएमसीच्या गडाला...

West Bengal Legislative Election 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी; टीएमसीच्या गडाला सुरुंग, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये अखेर 15 वर्षांनंतर चित्र पालटले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का देत भाजपने जोरदार मुसंडी घेतली आहे. त्यामुळे अखेर ममता दिदिंचा भाजपने बंगालमधील सत्ता संपुष्टात आणल्याचे पहायला मिळत आहे. भाजप 193 आणि तृणमूल काँग्रेसने 94 जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित होत असताना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजप आणि टीएमसीमध्ये असलेला मतांचा आणि जागांचा फरक भरून काढणे, अशक्य दिसत आहे. परंतु, ममता बॅनर्जी यांनी तरी सुद्धा त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडू नये. हा भाजपचा प्लॅन आहे, मी कालपासून सांगतेय की त्यांना आधी आघाडीवर दाखवले जाईल. त्यांनी अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवली आहे. कल्याणीमध्ये अशी यंत्रे सापडली आहेत जिथे मेळ बसत नाहीये. केंद्रीय दलांच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसवर सर्व बाजूंनी अत्याचार केले जात आहेत, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

- Advertisement -

आपलाच विजय होईल
‘SIR’ (निवडणूक यंत्रणा) च्या माध्यमातून त्यांनी मते चोरण्याचा प्रयत्न केला, तरीही सध्या आम्ही 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहोत. ज्याची मात्र कुठेही नोंद घेतली जात नाहीये. सर्व काही चुकीच्या पद्धतीनेच प्रसिद्ध केले जात आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे आपल्या मर्जीनुसार काम करत आहे आणि केंद्रीय दलेही त्यांनाच साथ देत आहेत. स्थानिक पोलीसही केंद्रीय दलांच्याच सोबतीने काम करत आहेत. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगते की, निराश होण्याची काहीच गरज नाही; सूर्यास्तानंतर तुमचाच विजय होईल. मतमोजणीच्या केवळ 2-4 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, ही प्रक्रिया १४ ते १८ फेऱ्यांपर्यंत चालते आणि अंतिमतः आपलाच विजय होईल. कुणीही घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Assam Legislative Election 2026: भाजपची विजयी हॅट्रिककडे वाटचाल; आसाममध्ये मामा-मियाची जादू

ताज्या बातम्या

Nashik News : पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर उद्या धर्मध्वजारोहण

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकचे श्रद्धास्थान असलेल्या काळाराम मंदिरात अयोध्येच्या धर्तीवर २१ फूट उंच भव्य पितळी ध्वजदंड उभारण्यात आला आहे. या ध्वजदंडावर...